मराठी अभिनेत्री अश्विनी महांगडे ही नेहमीच विविध कारणांमुळे चर्चेत असते. गेले अनेक महिने ती ‘आई कुठे काय करते’ या मालिकेत अनघा हे पात्र साकारत आहे. अश्विनी नुकतीच ‘महाराष्ट्र शाहीर’ या चित्रपटाच्या माध्यमातून मोठ्या पडद्यावर झळकली होती. असंख्य दर्जेदार भूमिका साकारल्यानंतर आता अश्विनी एका शॉर्ट फिल्मच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर ही शॉर्ट फिल्म प्रदर्शित करण्यात आली आहे.

हेही वाचा : “विशिष्ट समुहामुळे माझे करिअर…”, ‘जय हो’ फेम डेझी शाहचा बॉलीवूडबद्दल मोठा खुलासा; म्हणाली, “मानसिक तणावामुळे…”

girl bedroom
“माझ्या बेडरुममध्ये…”, जेईईचा अभ्यास करणाऱ्या मुलीवर पाळत ठेवण्याकरता पालकांचा ‘हा’ निर्णय तुम्हाला पटतो का?
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
prarthana behere shares emotional post as demise of her brother
“तू अचानक निघून गेलास…”, जवळच्या व्यक्तीच्या निधनानंतर अभिनेत्री प्रार्थना बेहेरेची भावुक पोस्ट
youth dies by suicide
प्रेयसीशी व्हिडीओ कॉलवर बोलत असताना तरुणानं केली आत्महत्या
Government Nursing Training School , Bhandara ,
भंडारा : गुण वाढवण्यासाठी प्राचार्यांनी विद्यार्थिनींकडे केली शरीरसुखाची मागणी
Bipasha Basu
Video: बिपाशा बासूने शेअर केला लाडक्या लेकीचा व्हिडीओ; ‘देवी’ने जिंकली चाहत्यांची मने, पाहा व्हिडीओ
Vanita Kharat
“कॉपी करताना…”, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम वनिता खरात म्हणाली, “हिंमत तर एवढी…”
epileptic attack, youth epileptic attack, Pune,
पुणे : अपघातानंतर तरुणाला अपस्माराचा झटका, पोलीस उपायुक्त संदीप भाजीभाकरेंच्या तत्परतेमुळे वैद्यकीय मदत

‘आई कुठे काय करते’फेम अश्विनी महांगडेने प्रमुख भूमिका साकारलेली शॉर्ट फिल्म मुलींच्या जीवनावर आधारित आहे. दररोज कामावर जाणाऱ्या मुलीचा रस्त्यावरील गुंडांकडून होणारा छळ आणि त्यानंतर ती मुलगी अन्यायाविरुद्ध कशी लढा देते? यावर आधारित शॉर्ट फिल्मचे कथानक आहे.

हेही वाचा : “दिग्पालला एका क्षणात…”, स्मिता शेवाळेने सांगितला ‘सुभेदार’बद्दलचा अनुभव; म्हणाली, “माझं खूप मोठं भाग्य…”

अश्विनी महांगडे प्रमुख भूमिका साकारत असलेल्या शॉर्ट फिल्मचे लेखन भाग्यशाली राऊत यांनी केले आहे. सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत अभिनेत्री म्हणाली, “या शॉर्ट फिल्मची सुरुवात जरी मी आणि भाग्यशालीने केली असली तरी यात काम करणारे आणि या प्रवासात आमच्यासोबत असणाऱ्या सगळ्यांनी प्रचंड मेहनत केली.” अभिनेत्रीने पुढे या फिल्ममधील मुख्य कलाकारांना टॅग करून “१५ ऑगस्ट, स्वातंत्र्यदिन, मुली खरंच स्वतंत्र आहे का?” असे लिहिले आहे.

हेही वाचा : ‘बाईपण भारी देवा’नंतर सुकन्या मोने दिसणार ‘या’ चित्रपटात; शूटिंगला सुरुवात

प्रत्येक मुलीने स्वत:चे रक्षण केले पाहिजे असा संदेश शॉर्ट फिल्मच्या माध्यमांतून देण्यात आला आहे. तसेच महिलांची छेडछाड करणे हा भारतीय दंड संहिता कलम ३५४ नुसार गुन्हा असून १ वर्षांपासून ते ५ वर्षांपर्यंत शिक्षा होऊ शकते असेही या शॉर्ट फिल्मच्या शेवटी सांगण्यात आले आहे. दरम्यान, अश्विनीच्या पोस्टवर कमेंट करत नेटकऱ्यांनी तिच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे.

Story img Loader