अभिनेता आस्ताद काळे आणि अभिनेत्री स्वप्नाली पाटील मराठी मनोरंजनसृष्टील लोकप्रिय जोडी आहे. सोशल मीडियावर दोघे नेहमी सक्रिय असतात. फोटो आणि व्हिडीओ शेअर करत ते चाहत्यांना अपडेट देत असतात. काही वर्ष डेट केल्यानंतर दोघांनी लग्नगाठ बांधली. लग्नाअगोदर ते काही वर्ष लिव्ह इनमध्ये होते. नुकत्याच एका मुलाखतीत दोघांनी आपल्या लिव्ह इन रिलेशनशिपचा अनुभव सांगितला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा- “मी आणि पप्या भेटलो की…”; सुप्रिया पाठारेंनी शेअर केला ‘दगडू’बरोबरचा खास फोटो, म्हणाल्या…

स्वप्नाली म्हणाली, “लगेच लग्न करण्याची माझी इच्छा नव्हती. आस्तादची तशी काहीच इच्छा नव्हती. घरूनही आम्हाला लग्नासाठी कोणताच दबाव नव्हता. पण, दोघांचेही स्वभाव सारखे होते हा प्रॉब्लेम होता. त्यातूनच आमचे एकमेकांबरोबर जास्त खटके उडून भांडणं होत होती. घाईघाईत घेतलेल्या निर्णयाचे परिणाम मी भोगले होते, आता मला ते पुन्हा नको होतं; त्यामुळे लग्नाचा निर्णय शांतपणे घेऊयात असं मी आस्तादला म्हणाले.”

आस्ताद म्हणाला, “लॉकडाऊन लागायच्या अगोदर दीड वर्ष आम्ही लिव्ह इनमध्ये होतो. स्वप्नाली तिच्या दोन मैत्रिणींबरोबर राहायची तेव्हा मी माझ्या घरापेक्षा हिच्याच घरी जास्त रहायचो. मुंबईतील माझ्या घराचं भाडं मी फक्त सामान ठेवण्यासाठी देत होतो. लिव्ह इन रिलेशनशिपचा फायदा होतो. आमच्या दोघांच्या घरच्यांचाही लिव्ह इन रिलेशनशिपसाठी पाठिंबा होता. स्वप्नाली मैत्रिणींबरोबर राहायची आणि मी तिच्याच घरी नेहमी असायचो आणि दुसरं म्हणजे आमचं नातंही जगजाहीर झालं होतं. त्यामुळे आम्ही एकत्र राहूयात असा विचार केला.”

हेही वाचा- जो मुलगा सुरुवातीला अजिबात आवडायचा नाही त्याच्याशीच झालं लग्न, ‘अशी’ आहे स्पृहा जोशीची फिल्मी लव्हस्टोरी

‘पुढचं पाऊल’ मालिकेच्या सेटवर आस्ताद आणि स्वप्नालीची पहिल्यांदा भेट झाली होती. हळू हळू दोघांमध्ये मैत्री झाली आणि मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. मराठी बिग बॉसमध्ये आस्तादने पहिल्यांदा सगळ्यांसमोर स्वप्नालीवरच प्रेम जाहीर केलं होतं. काही वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर दोघांनी सप्टेंबर २०२१ मध्ये लग्नगाठ बांधली. दोघांनी रजिस्टर पद्धतीने लग्न केलं होतं. लग्नातील दोघांच्या शाही लूकचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.