‘बिग बॉस मराठी’च्या पहिल्या पर्वात झळकल्यानंतर आस्ताद काळे अनेकदा चर्चेत आला. आस्तादने अनेक नाटक, मालिकांमध्ये काम केलंय. नुकतीच आस्तादने ‘आरपार’च्या यूट्यूब चॅनेलला मुलाखत दिली. या मुलाखतीदरम्यान पर्शियन नावाच्या ट्रोलिंगबद्दल त्याने आपलं मत व्यक्त केलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

अलीकडेच चिन्मय मांडलेकर आणि त्याची पत्नी नेहा यांच्या मुलाच्या नावावरून सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात ट्रोलिंग झालं होतं. मुलाचं नाव जहांगीर ठेवल्यामुळे अनेकांनी त्याच्याबद्दल खूप वाईट साईट कमेंट्स केल्या होत्या. मुळात जहांगीर हे नाव पर्शियन आहे हे फार कमी लोकांना माहीत आहे. या ट्रोलिंगच्या झालेल्या त्रासामुळे तो यापुढे कधीच छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका करणार नाही असंही चिन्मयने सांगितलं होतं. त्यावरूनही चिन्मयला ट्रोल केलं गेलं.

हेही वाचा… “माझी जीभ काळी आहे”; फराह खान तिच्याशी वाईट वागणाऱ्यांना देते शाप; म्हणाली, “त्यांचे २-३ चित्रपट फ्लॉप…”

आस्तादचं नावही पर्शियनचं आहे. याच मुद्द्यावरून मुलाखतदाराने पर्शियन नावाबद्दल जे ट्रोलिंग झालं आणि त्याचं स्वत:चं नावदेखील पर्शियन असल्याकारणाने याबद्दल त्याचं मत विचारलं.

‘आरपार’ला दिलेल्या मुलाखतीत आस्ताद काळे म्हणाला, “नशिबाने माझ्या या नावाचा कोणी सुलतान वगैरे होऊन गेला नाहीय, त्यामुळे माझे आई-वडील वाचले. मला असं वाटतं, खरंतर हा वैयक्तिक प्रश्न आहे. कारण गजानन नावाचा माणूस गुन्हेगार नाही होऊ शकत का; तर तसं नाही. गजानन नावाचेदेखील गुन्हेगार आहेत आणि ते सगळ्यांना माहिती आहे. मनोज, राजन नावाचे गुन्हेगार होऊन गेलेत. नावात काहीच नसतं, तुम्ही घरी संस्कार काय करताय यावर सगळं अवलंबून असतं.”

आस्ताद पुढे म्हणाला, “पण प्रत्येक गोष्ट धर्माकडे आणि जातीकडे न्यायचीच असेल तर जाऊदे, ती एक मनोवृत्ती आहे; मी त्याला विरोधही करायला जाणार नाही आणि त्याला पाठिंबा तर मुळीच देणार नाही. चिन्मय आणि नेहा हा मुद्दा हाताळण्यासाठी खूप परिपक्व आहेत. मला त्याचा सामना करावा लागला नाही, कारण जेव्हा माझं नाव ठेवलं गेलं, तेव्हा धार्मिक भावना एवढ्या बोथट नव्हत्या.”

हेही वाचा… “यापुढे मी महाराजांची भूमिका करणार नाही”, मुलाच्या नावाने होणाऱ्या ट्रोलिंगबद्दल चिन्मय मांडलेकर स्पष्टच म्हणाला…

“खरंतर हे नाव पारसी किंवा पर्शियन आहे हेच लोकांना माहीत नसेल आणि या नावाचा सुलतान, जुलमी किंवा आक्रमणकर्ता असा कोणीच होऊन नाही गेलाय. आतापर्यंत तरी असं काही इतिहासात बाहेर आलेलं नाही, पुढे आलं तर मग माझंही ट्रोलिंग होईल, मग बघू काय करायचंय ते”, असंही आस्ताद म्हणाला.

दरम्यान, आस्ताद काळेच्या कामाबद्दल सांगायचं झालं तर, आस्तादने अनेक मालिका आणि नाटकांमध्ये काम केलंय. ‘पुढचं पाऊल’, ‘ऊन-पाऊस’, ‘असंभव’, ‘अग्निहोत्र’ अशा अनेक मालिकांमध्ये तो झळकला होता.