काही वर्षांपूर्वी ‘स्टार प्रवाह’वर अग्निहोत्र ही मालिका आली आणि ती प्रचंड गाजली. सतीश राजवाडे यांनी ही मालिका दिग्दर्शित केली होती. वाडा, आठ गणपती आणि त्याभोवती फिरणाऱ्या कथानकातून एकत्र आलेल्या अग्निहोत्रींच्या तीन पिढ्या असे या मालिकेचे कथानक होते. मालिका संपूनही आता बरीच वर्षे झाली आहेत. तर ही मालिका संपल्यानंतर याचा एकही एपिसोड इंटरनेटवर उपलब्ध नव्हता. त्यामुळे अनेक प्रेक्षक ही मालिका पुन्हा दाखवली गेली पाहिजे अशी मागणी करत होते. तर काही दिवसांपूर्वी स्टार प्रवाहने ही संपूर्ण मालिका यू ट्यूबवर अपलोड केली जाईल असं सांगत प्रेक्षकांना सुखद धक्का दिला. पण एपिसोड पाहून प्रेक्षक चॅनेलवर नाराज झाले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘अग्निहोत्र’ या मालिकेत दिवंगत अभिनेते विक्रम गोखले, दिवंगत अभिनेते विनय आपटे, मोहन आगाशे, सुहास जोशी, मोहन जोशी, शरद पोंक्षे, इला भाटे, शुभांगी गोखले, डॉ. गिरीश ओक, मेघना वैद्य, उदय टिकेकर, लीना भागवत, मुक्ता बर्वे अशा अनेक दिग्गज कलाकारांबरोबरच सिद्धार्थ चांदेकर, मृण्मयी देशपांडे, आस्ताद काळे, स्पृहा जोशी, मृण्मयी गोडबोले हे कलाकार प्रेक्षकांच्या भेटीला आले. या मालिकेच्या माध्यमातून अनेक तरुण कलाकारांनी अभिनय क्षेत्रात पाऊल टाकलं. सर्वांच्याच कामाचं, मालिकेच्या कथेचं, दिग्दर्शनाचं प्रेक्षकांकडून भरभरून कौतुक केलं गेलं. प्रेक्षकांच्या आग्रहाखातर ही मालिका आता यू ट्यूबवर पुनः प्रसारित केली जात आहे. परंतु या मालिकेचे आता दाखवण्यात येणारे भाग पाहून प्रेक्षक नाराजी व्यक्त करत आहेत.

आणखी वाचा : Video: नाचता नाचता स्टेजवरून खाली पडला कुशल बद्रिके, ‘चला हवा येऊ द्या’मधील व्हिडीओ व्हायरल

सध्या या मालिकेचे रोज दोन एपिसोड स्टार प्रवाहच्या यू ट्यूब चॅनलवरून अपलोड केले जात आहेत. सुरुवातीचे काही एपिसोड व्यवस्थित अपलोड केले गेले मात्र नंतर एपिसोड अपलोड करताना एपिसोड क्रमांक टाकला जात नाही, एपिसोड पूर्ण अपलोड केला जात नाही, सीन मध्येच कट केले जातात अशी तक्रार प्रेक्षक करू लागले आहेत.

हेही वाचा : दोन दिवसांत पिंपल घालवायचेत? सुकन्या मोनेंनी सांगितला सोपा घरगुती उपाय, म्हणाल्या…

त्यांनी यू ट्यूबवर अपलोड केलेल्या प्रत्येक एपिसोडच्या कमेंट सेक्शनमध्ये प्रेक्षक रोजच त्यांची तक्रार व्यक्त करत आहेत. अनेक नेटकऱ्यां लिहिलं, “कृपया सगळे एपिसोड अपलोड करा.” तर काही जणांनी लिहिलं, “तुम्ही प्रत्येक एपिसोड कट करत आहात. त्यामुळे लिंक तुटते.” एक नेटकरी नाराजी व्यक्त करत म्हणाला, “आज पासून सिरीयल पाहणं बंद करण्यावाचून पर्याय नाही. अर्धवट भाग अपलोड करून सिरीयल पाहण्याची इच्छा नाहीशी केली स्टार वाल्यांनी.” अशा विविध प्रतिक्रिया देत प्रेक्षक नाराजी व्यक्त करत आहेत.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Audience get angry on star pravah channel because of agnihotra serial rnv
First published on: 12-03-2023 at 16:50 IST