छोट्या पडद्यावरील ‘शार्क टँक इंडिया’ या रीयालिटि शोला लोकांनी चांगलीच पसंती दर्शवली. नवीन बिझनेसच्या संकल्पनेत पैसे गुंतवण्याच्या या नव्या स्पर्धेला प्रेक्षकांनी डोक्यावर घेतलं. परदेशात हा कार्यक्रम हीट ठरला, पण भारतात या कार्यक्रमाची क्रेझ निर्माण झाली ती अशनीर ग्रोव्हर या परीक्षकामुळे. पहिल्या सीझनमधल्या शार्क्सपैकी अशनीरने शार्कने सोशल मीडियावर नुसता धुमाकूळ घातला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

त्याचं सडेतोड बोलणं, भूमिका घेणं, नावडत्या गोष्टीला थेट नकार देणं, त्याचा फटकळ स्वभाव यामुळे तो ‘शार्क टँक इंडिया’चा सर्वात जास्त चर्चेत असणारा शार्क बनला. त्याच्या वेगवेगळ्या कॉमेंटची मिम्सदेखील प्रचंड व्हायरल झाली होती, पण आता या ‘शार्क टँक इंडिया’च्या दुसऱ्या सीझनमध्ये अशनीर दिसणार नसल्याने या कार्यक्रमाचे चाहते चांगलेच नाराज झाले आहेत.

आणखी वाचा : निळ्या विश्वात हरवून जाण्यासाठी प्रेक्षक सज्ज; ‘अवतार द वे ऑफ वॉटर’चा जबरदस्त दूसरा ट्रेलर प्रदर्शित

सोनी टेलिव्हिजनच्या सोशल मिडिया अकाऊंटवर एक ट्रेलर प्रदर्शित करून ‘शार्क टँक इंडिया सीझन २’ची घोषणा करण्यात आली. या नव्या सीझनसाठी प्रेक्षक चांगलेच उत्सुक आहेत. पण या सीझनमध्ये अशनीर नसल्याने काही मजा नाही असं दर्शकांचं म्हणणं आहे. अशनीरचे डायलॉग वापरत प्रेक्षकांनी त्याला परत आणायची मागणी केली आहे. अशनीरशिवाय हा कार्यक्रम अपूर्ण आहे असं नेटकरी म्हणत आहे. याबद्दलचे भन्नाट मिम्ससुद्धा सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

अशनीर त्याच्या लग्झरी लाईफास्टाईलमुळे आणि वादग्रस्त कोर्टकेसमुळे चर्चेत होता. आता या नवीन सीझनमध्ये तो नसल्याने प्रेक्षक चांगलेच नाराज झाले आहेत.कार्यक्रमाच्या पहिल्या सीझन प्रमाणेच दुसऱ्या सीझनमध्ये देखील ‘शादी डॉट कॉम’ची को-फाऊंडर अनुपम मित्तल, ‘बोट’ कंपनीचे को-फाऊंडर अमन गुप्ता,‘लेंस्कार्ट’चे संस्थापक पीयुष बंसल असे जून शार्क्स या दुसऱ्या सीझनमध्ये परीक्षकाची भूमिका पार पाडतील. अशनीर ऐवजी ‘कार देखो’ ग्रुपचे सीईओ अमित जैनच दुसऱ्या सीझनमध्ये झळकणार आहे.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Audience is not happy for shark tank india season 2 because ashneer grover is not a part of the show avn
Show comments