‘आई कुठे काय करते’ ही छोट्या पडद्यावरील अत्यंत लोकप्रिय मालिका आहे. अल्पावधीतच या मालिकेने प्रेक्षकांची पसंती मिळवली. या मालिकेतील कलाकारांचा अभिनय आणि याचबरोबर या मालिकेची कथा प्रेक्षकांना खूप आवडली. या मालिकेत वरचेवर अनेक ट्विस्ट आणि टर्न येत असतात. पण आता नुकत्याच दाखवल्या गेलेल्या एका एपिसोडमुळे प्रेक्षक या मालिकेला आणि अरुंधतीला ट्रोल करू लागले आहेत.

या मालिकेत अभिनेत्री मधुराणी प्रभुलकर हिने अरुंधती ही भूमिका साकारली आहे. ती साकारत असलेल्या या व्यक्तिरेखेचं प्रेक्षकांकडून अनेकदा कौतुक होतं. तर काही वेळा या मालिकेत दाखवल्या गेलेल्या काही दृश्यांमुळे मालिकेला आणि ‘अरुंधती’ या व्यक्तिरेखेला प्रेक्षक ट्रोल करतात. आता पुन्हा एकदा असंच काही घडताना दिसत आहे.

आणखी वाचा : “बाई तू परत ये, इथे सगळ्यांना वेड लागलंय…,” ‘आई कुठे काय करते’ फेम मधुराणी प्रभुलकरला नेटकऱ्यांनी घातलं साकडं, म्हणाले…

अरुंधतीच्या घरी विविध प्रॉब्लेम्स सुरू असताना आशुतोष आणि अरुंधती फिरायला गेल्याचं मालिकेत दाखवण्यात आलं. पण ते फिरायला जात असताना त्यांची चाहती आरोही हिच्यावर काही गुंडांकडून बलात्कार केला जातो. तर त्यानंतर अरुंधती तिला न्याय मिळवून देण्याचा निश्चय करते. या दरम्यानचा एक छोटा व्हिडीओ सोशल मीडियावर वाहिनीने पोस्ट केला. पण आता त्यावर कमेंट करत नेटकरी अरुंधतीच्या वागण्यामुळे तिला ट्रोल करताना दिसत आहेत.

हेही वाचा : “माझी ही अवस्था ईश्वराला समजली असणार म्हणून…,” ‘आई कुठे काय करते’ फेम मधुराणी प्रभुलकरची पोस्टने वेधलं लक्ष

या व्हिडीओवर कमेंट करत एकाने लिहिलं, “लष्कराच्या भाकऱ्या भाजत बस. आता यशच लग्न हिच्याशी लावून देवून मग दुसऱ्या लफड्यात पडायला अरुंधती मोकळी. पहिल्यांदाच पोलिसांना बोलवायचं ना. कशाला स्वतःहून हुशारी करायची आणि नसता आमच्या डोक्याला शॉट द्यायचा.” तर दुसरा नेटकरी म्हणाला, “हिला स्वतःचं पोर सांभाळता आली नाही आणि ही काय नाटक करते आहे बिनडोक बाई.” तर आणखी एकाने लिहिलं, “म्हणजे आता न्याय देणार तोपर्यंत पाहायचे ?” तर आणखी एक म्हणाला, “बंद करा ही सिरीयल. खूप भरकटली आहे.”

Story img Loader