‘शार्क टॅंक इंडिया’चा पहिलं पर्व खूप गाजलं. त्यानंतर आता नुकतंच या कार्यक्रमाचं दुसरं पर्व प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. या कार्यक्रमाच्या पहिल्या पर्वाप्रमाणेच दुसरं पर्वही प्रचंड गाजत आहे. या पर्वात पियुष बन्सल, विनिता सिंग, नमिता थापर, अनुपम मित्तल आणि अमन गुप्ता हे शार्क्सच्या खुर्चीत बसलेले आहेत. एकीकडे हे सर्वजण प्रेक्षकांच्या चांगलेच पसंतीस पडले आहेत. पण दुसरीकडे जसजसा हा कार्यक्रम पुढे जातोय तस तशी या परीक्षकांवर टीका केली जात आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

या कार्यक्रमाची जज नमिता थापर ही नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. आता तिची तुलना बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडेशी केली जात आहे. नमिता ही घराणेशाहीमुळे पुढे आली असल्याचं या प्रसिद्ध लेखकाने पोस्ट करत म्हटलं. त्यामुळे त्याच्या या वक्तव्यावरून आता सोशल मीडियावर अनेकांमध्ये मतभेद निर्माण झाले आहेत.

आणखी वाचा : राखी सावंतचा संसार वाचवण्यासाठी सलमान खानने केली मध्यस्थी, खुलासा करत अभिनेत्री म्हणाली, “त्याने आदिलला…”

अ‍ॅमेझॉनवर लोकप्रिय लेखकांच्या यादीत सामील असलेल्या अंकित उत्तम याने लिंक्डइन या साइटवर एक पोस्ट शेअर केली. यात त्याने नमिताची तुलना अनन्या पांडेशी केली. त्याने लिहिलं, “एमक्यूअर फार्मा ही कंपनी नमिता थापरने नाही तर तिच्या वडिलांनी सुरु केली आणि आजही तेच या कंपनीचे सीईओ आहेत. त्यामुळे या कंपनीत तिचा सहभाग हा बॉलिवूडमधील अनन्या पांडेच्या सहभागाइतकाच आहे.”

हेही वाचा : Shark Tank India 2: कार्यक्रमादरम्यान मोठा वाद, अनुपम मित्तलशी झालेल्या भांडणामुळे नमिता थापरने सोडला मंच

अंकितची ही पोस्ट सध्या चांगलीच चर्चेत आली आहे. अनेकांना अंकितचं हे बोलणं पटलेलं नसून नमिताची बाजू घेत त्यांनी कमेंट्स केल्या आहेत. एकाने लिहिलं, “तू नमिताला कमी लेखतोयस कारण ती त्यांच्या कुटुंबाचा व्यवसाय सांभाळत आहे. असा विचार केला तर भारतातील आघाडीच्या कंपन्यांचे आज असलेले मालक त्यांचा पिढीजात व्यवसायात सांभाळत आहेत. यात मुकेश अंबानी आणि रतन टाटा यांचंही नाव सामील आहेत.” तर दुसरा नेटकरी म्हणाला, “भारतातील व्यवसाय हे खूप वेगळे असतात. त्यामुळे ही तुलना करणं योग्य नाही.” त्यामुळे आता नमिता याला काय उत्तर देते याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Author ankit uttam compared namita thapar with ananya pandey rnv
Show comments