छोट्या पडद्यावरील काही कार्यक्रमांना प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळते. यातील काही कार्यक्रमांनी प्रेक्षकांच्या मनात अढळ स्थान निर्माण केले आहे. या कार्यक्रमांनी टीआरपीच्या शर्यतीतदेखील बाजी मारली आहे. असाच एक कार्यक्रम म्हणजे ‘खुपते तिथे गुप्ते’. आता लवकर या कार्यक्रमाच्या नव्या पर्वाला सुरुवात होणार आहे. आता त्याचा एक प्रोमो समोर आला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मराठी गायक, संगीतकार अवधूत गुप्तेचा प्रसिद्ध टॉक शो म्हणून ‘खुपते तिथे गुप्ते’ कार्यक्रमाकडे पाहिले जाते. या कार्यक्रम चांगला लोकप्रिय ठरला होता. या कार्यक्रमाचे पहिले दोन्हीही पर्व चांगलेच गाजले होते. पण त्यानंतर काही वर्ष हा कार्यक्रम बंद करण्यात आला. आता हा कार्यक्रम पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.
आणखी वाचा : “प्रेमाने जखम दिली तर…” उर्मिला कोठारेने दिलेलं थेट उत्तर 

झी मराठीने नुकतंच या कार्यक्रमाचा एक प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमो व्हिडीओची सुरुवात अवधूत गुप्तेच्या बोलण्यावरुन होते. “ही खुर्ची देशाचं भविष्य घडवते, ही निर्दोषांना न्याय मिळवून देते, ही माणसाचा जीव वाचवते आणि ही खुर्ची प्रश्न विचारते. हिच्या प्रश्नांनाही खूप धार आहे, या खुर्चीवर बसायला कोण-कोण तयार आहे. आता खुपणार नाही तर टोचणार”, असे अवधूत गुप्ते यावेळी बोलताना दिसत आहे.

‘खुपते तिथे गुप्ते’ या कार्यक्रमाच्या माध्यमातून अवधूत गुप्ते खुपणारी गोष्ट समोर आणणार आहे. ‘खुपते तिथे गुप्ते’चं हे पर्व वेगळं असणार आहे. या पर्वाचं खास आकर्षण एक खास खुर्ची असणार आहे. या खुर्चीसाठी सगळीकडे चढाओढ पाहायला मिळणार आहे. नोकरदार, कॉर्पोरेट आणि राजकारणी मंडळींमध्ये खुर्चीसाठीची ही चढाओढ पाहायला मिळणार आहे. 

आणखी वाचा : “माझ्या नवऱ्याचं दुसरं लग्न अन् चर्चा मात्र बोल्ड फोटोशूटची”, पल्लवी पाटीलने सांगितला ‘तो’ किस्सा, म्हणाली “ही वेळ…”

दरम्यान ‘खुपते तिथे गुप्ते’ हा कार्यक्रम तब्बल १० वर्षांनी पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. येत्या ४ जूनपासून दर रविवारी रात्री ९ वाजता हा कार्यक्रम पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून अनेक गुपिते उलगडली जाणार आहेत.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Avadhoot gupte famous khupte tithe gupte marathi television show releases date see new promo video nrp