Bigg Boss 18: ‘बिग बॉस’च्या १८व्या पर्वात नुकताच ‘टाइम गॉड’चा टास्क पार पडला आणि विवियन डिसेना ‘टाइम गॉड’ झाला. यानंतर एक मजेशीर टास्क झाला आहे. ज्यामध्ये अविनाश मिश्रा-ईशा सिंह आणि करणवीर मेहरा-चुम दरांग या दोन जोड्यांनी जबरदस्त डान्स केला आहे. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आला आहे.

‘बिग बॉस’च्या घरातील सदस्यांना बेडसंबंधित डान्स टास्क दिल्याचं व्हायरल व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे. यावेळी अविनाश मिश्रा शर्टलेस होऊन ईशा सिंहबरोबर डान्स करताना दिसत आहे. दोघं आमिर खान आणि जुई चावलाच्या ‘नींद चुराई मेरी’ गाण्यावर डान्स करताना पाहायला मिळत आहे.

हेही वाचा – Bigg Boss 18: विवियन डिसेनाने ‘या’ दोन सदस्यांना पाठवलं जेलमध्ये, रेशन वाटपाचा अधिकार असणार आता यांच्या हातात

तसंच त्यानंतर दुसऱ्या बाजूला करणवीर मेहरा आणि चुम दरांग डान्स करताना दिसत आहे. दोघं आदित्य रॉय-कपूर आणि श्रद्धा कपूरच्या ‘द हम्मा’ गाण्यावर नाचताना पाहायला मिळत आहेत. करण आणि चुम बेडवर उड्या मारून डान्स करत आहेत, जे पाहून घरातील सदस्य एन्जॉय करताना दिसत आहे. तर काही सदस्यांना करण आणि चुमचा डान्स पाहून आश्चर्याचा धक्काच बसला आहे. पण, या दोन जोड्यांपैकी या टास्कमध्ये कोण बाजी मारतंय हे येत्या भागात स्पष्ट होईल.

हेही वाचा – Bigg Boss 18: ‘टाइम गॉड’ होताच विवियन डिसेनाचं बदललं रुप, श्रुतिका अर्जुनशी झाले वाद

गेल्या काही दिवसांपासून करणला चुमवरून घरातील सदस्य चिडवताना दिसत आहे. एवढंच नाहीतर ‘बिग बॉस’ आणि सलमान खान देखील करणला चुमवरून चिडवतात. अलीकडेच दोघांनी सारख्या रंगाचे कपडे परिधान केले होते म्हणून ‘बिग बॉस’ चिडवताना पाहायला मिळाले.

हेही वाचा – “फरसाण खायचं बंद कर”, ऑरा जपण्यासाठी प्राजक्ता माळी काय करते ऐकून नेटकऱ्यांनी केलं ट्रोल, म्हणाले, “गावात राहणारा माणूस…”

दरम्यान, ‘बिग बॉस’च्या १८व्या पर्वाच्या चौथ्या आठवड्यात अविनाश मिश्रा, ईशा सिंह, एलिस कौशिक, श्रुतिका अर्जुन, अरफीन खान, शिल्पा शिरोडकर आणि शहजादा या सदस्यांना बहुमताने नॉमिनेट केलं आहे. या एकूण सात सदस्यांमधून कोण घराबाहेर होतंय हे पाहणं उत्सुकतेचं आहे. याआधी गुणरत्न सदावर्ते, हेमा शर्मा, मुस्कान बामने, नायरा बनर्जी हे चार सदस्य बेघर झाले होते.