Avni Taywade : सध्याच्या घडीला विविध मालिकांमध्ये नवनवीन कलाकारांच्या एन्ट्री होत असल्याचं पाहायला मिळत आहे. काही दिवसांपूर्वीच ‘स्टार प्रवाह’च्या लोकप्रिय मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला. २०२२ मध्ये ‘तुझेच मी गीत गात आहे’ ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. जवळपास ३ महिन्यांपूर्वी म्हणजेच १६ जून २०२४ रोजी या मालिकेने चाहत्यांचा निरोप घेतला.

‘तुझेच मी गीत गात आहे’ मालिकेत उर्मिला कोठारे, अभिजीत खांडकेकर, हार्दिक जोशी, तेजस्विनी लोणारी यांच्या प्रमुख भूमिका होत्या. याशिवाय बालकलाकार अवनी तायवाडे ( Avni Taywade ) या मालिकेत मध्यवर्ती भूमिका साकारत होती. तिच्या पात्राचं नाव स्वरा कामत असं होतं. या मालिकेत अवनीने साकारलेल्या भूमिकेचं सर्वत्र कौतुक करण्यात आलं. आता लवकरच ही बालकलाकार एका नव्या मालिकेत झळकणार आहे.

हेही वाचा : “वीट आलाय या लोकांचा…”, ‘करवा चौथ’वरून ट्रोल करणाऱ्यांना मराठी अभिनेत्याने सुनावलं, वस्तुस्थिती सांगत म्हणाला…

स्वराची भूमिका साकारणारी बालकलाकार अभिनेत्री अवनी तायवाडे ( Avni Taywade ) स्टार प्रवाहच्या ‘अबोली’ मालिकेत एन्ट्री घेणार आहे. या मालिकेत ती चार्वी हे पात्र साकारणार आहे. आता चार्वीच्या येण्याने ‘अबोली’ मालिकेत काय वळण हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. ही मालिका ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवर सोमवार ते शनिवार रात्री १०.३० वाजता प्रक्षेपित केली जाते.

अवनीच्या ( Avni Taywade ) चार्वी या भूमिकेची नव्या मालिकेतील पहिली झलक वाहिनीने सोशल मीडियावर शेअर केली आहे. यामध्ये ही बालकलाकार निळ्या रंगाचा फ्लोरल प्रिंटचा छानसा ड्रेस घालून तयार झाल्याचं पाहायला मिळत आहे. हातात मोत्याचं ब्रेसलेट आणि चेहऱ्यावर निरागसता अशा चार्वीच्या नव्या लूकला प्रेक्षकांची सुद्धा पसंती मिळत आहे.

हेही वाचा : “सॅनिटरी पॅड दाखवतेस का…”, प्रसिद्ध अभिनेत्रीला बॉयफ्रेंडने विचारला होता ‘तो’ प्रश्न, मासिक पाळी दरम्यानचा अनुभव सांगत म्हणाली…

‘तुझेच मी गीत गात आहे’ फेम अवनीची ‘अबोली’ मालिकेत एन्ट्री ( Avni Taywade )

हेही वाचा : एकेकाळी ज्याच्याशी मोडला साखरपुडा, आता त्यालाच डेट करतेय सोहेल खानची एक्स बायको, कोण आहे सीमा सजदेहचा बॉयफ्रेंड?

दरम्यान, ‘अबोली’ ( Aboli ) मालिका टीआरपीच्या शर्यतीत चांगल्या स्थानावर आहे. ही मालिका रात्री उशिरा प्रसारित होत असूनही सध्या प्रेक्षकांकडून मालिकेला चांगला प्रतिसाद मिळत आहे. यामध्ये गौरी कुलकर्णी, सचित पाटील, शर्मिष्ठा राऊत, माधव देवचके हे कलाकार प्रमुख भूमिका साकारत आहेत.