Badlapur Crime News : बदलापूरमध्ये शाळेतील दोन चिमुकल्या मुलींवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेनंतर सध्या सोशल मीडियावर संतापाची लाट उसळली आहे. राजकीय वर्तुळासह मनोरंजन विश्वातील कलाकारांनी या प्रकरणी संतप्त प्रतिक्रिया दिल्या आहेत. ‘बिग बॉस मराठी’च्या दुसऱ्या पर्वाची उपविजेती व लोकप्रिय अभिनेत्री नेहा शितोळेने यासंदर्भात पोस्ट शेअर करत आपलं मत मांडलं आहे.
बदलापूर ( Badlapur Crime News ) येथे शाळेच्या स्वच्छतागृहात ४ व ६ वर्षांच्या दोन मुलींवर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना घडली. हे प्रकरण उघडकीस आल्यावर संतप्त नागरिकांनी रस्त्यावर उतरून आंदोलन करण्यास सुरुवात केली आहे. नागरिकांच्या संतप्त जमावाने बदलापूर रेल्वे स्थानकावर देखील रेल रोको आंदोलन केलं. याशिवाय सोशल मीडियावर देखील यासंदर्भात प्रतिक्रिया उमटत आहेत.
हेही वाचा : रक्त खवळतंय, हँग द रेपिस्ट; बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणी मराठी कलाकारांनी व्यक्त केला संताप, पोस्ट चर्चेत
मराठी अभिनेत्रीची बदलापूर अत्याचार प्रकरणावर संतप्त पोस्ट
अभिनेत्री नेहा शितोळेने याप्रकरणी पोस्ट शेअर केली आहे. ती लिहिते, “काहीतरी भीषण, भीतीदायक आणि कायमचा धाक निर्माण करणारी शिक्षा सुनावायलाच पाहिजे… गोळ्या घालून लगेच विषय संपेल, फाशी देऊन मोकळं करू नका… तडपवून, तरसवून, हाल हाल करून मारा…”
नेहा शितोळेप्रमाणे मृण्मयी देशपांडे, अभिजीत केळकर, शिवाली परब, प्रसाद ओक या कलाकारांनी सुद्धा घडल्याप्रकाराबद्दल संताप व्यक्त करत लवकरात लवकर आरोपींना शिक्षा व्हावी अशी मागणी केली आहे. तसेच “माझं रक्त खवळतंय, आता ही कोणा एकाची लढाई नाहीये. याठिकाणी स्त्रिया व मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न आहे.” असं अभिनेत्री प्रिया बापटने पोस्ट शेअर करत म्हटलं आहे.
दरम्यान, बदलापूर प्रकरणी ( Badlapur Crime News ) आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्याशी चर्चा करून तातडीने कारवाईचे निर्देश दिले आहेत. तसेच हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
© IE Online Media Services (P) Ltd