Badlapur School Case : कोलकाता येथे काही दिवसांपूर्वीच प्रशिक्षणार्थी महिला डॉक्टरावर बलात्कार होऊन तिची हत्या करण्यात आल्याची घटना घडली होती. या विरोधात देशभरात संतापाची लाट उसळली असतानाच आता बदलापूरमधल्या शाळेतलं आणखी एक धक्कादायक प्रकरण उघडकीस आलं आहे. बदलापूर येथे शाळेच्या स्वच्छतागृहात ४ व ६ वर्षांच्या दोन मुलींवर लैंगिक अत्याचाराची घटना घडली आहे. हे प्रकरण उघडकीस आल्यावर संतप्त नागरिकांनी आज ( २० ऑगस्ट ) सकाळपासून रस्त्यावर उतरून आंदोलन करण्यास सुरुवात केली.

शाळेत घडलेल्या लैंगिक अत्याचाराचं ( Badlapur School Case ) प्रकरण समोर आल्यावर संतप्त नागरिकांनी बदलापूरच्या रुळांवर उतरून रेल्वे सेवा अडवून धरली. तसेच मुलींच्या सुरक्षेचं काय हा प्रश्न सातत्याने उपस्थित करत पोलीस, प्रशासकीय अधिकाऱ्यांना जाब विचारला. याबाबत आता महाराष्ट्राची हास्यजत्रा कार्यक्रमाचे दिग्दर्शक सचिन गोस्वामी यांनी पोस्ट शेअर करत आपलं मत मांडलं आहे.

Gujarat gold chain snatchers thieves active in vasai
गुजरातमधील सोनसाखळी चोर वसईत सक्रीय, गुन्हे प्रकटीकरण शाखेकडून अटक
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
atul subhash
Atul Subhash Suicide Case : अतुल सुभाषच्या सासू आणि मेव्हण्याने केलं पलायन; पोलीस म्हणतात, “त्यांना नजरकैदेत…”
mla sanjay rathod upset over baseless news spread against him by media
“मन दुखावले, जिव्हारी लागले…” आमदार संजय राठोड असे का म्हणाले?
Supreme Court News
Supreme Court : कामाच्या ठिकाणी भेदभाव झाल्याचा ट्रान्सवुमन शिक्षिकेचा आरोप, सर्वोच्च न्यायालयाने याचिकेवरील निकाल ठेवला राखून
young woman abandoned her newborn near Vanzra Layout Nagpur
अनैतिक संबंधातून जन्मलेल्या बाळाला रस्त्यावर फेकले
Vasai-Virar City Municipal Corporation
प्रभारी आयुक्त रमेश मनाळे यांची समाजमाध्यमावर बदनामी
in pune Karvenagar area drunk gang attacked youth due petty dispute
कर्वेनगरमध्ये मद्यपींकडून तरुणावर हल्ला, तिघांविरुद्ध खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गु्न्हा

हेही वाचा : Badlapur Sexual Assault Case : “…तर राज्यात पुन्हा अशी घटना घडणार नाही”, बदलापूर प्रकरणावरून उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारला सल्ला

महाराष्ट्राची हास्यजत्रा’चे दिग्दर्शक सचिन गोस्वामी यांची बदलापूर प्रकरणावर पोस्ट

“बदलापूरमध्ये सामान्य माणसांचा उद्रेक हा कायदा, सुरक्षा आणि न्याय प्रक्रियेवरचा विश्वास उडत चालल्याचे लक्षण आहे. निर्भया कांड, बंगालमधील डॉक्टरवरील अत्याचार… हाथरस घटना, मणिपूर, भातमोगे परिवारावरील अत्याचार अशा अनेक घटना… त्यात असलेला राजकीय नाकर्तेपणा, तपास यंत्रणांची दिरंगाई आणि न्यायास अक्षम्य विलंब यातून निर्माण होणारं नैराश्य असा उद्रेक घडवत आहे. शांततापूर्ण जगणाऱ्या सामान्य माणसाला दगड हाती घ्यावासा वाटणं हे पुढील उद्रेकाची नांदी आहे. कायदा ,सुव्यवस्था, न्याययंत्रणा तत्पर आणि वेगवान होणं गरजेचं आहे…घडतंय ते भयंकर आहे…क्लेशदायक आहे.” असं मत सचिन गोस्वामी यांनी बदलापूर प्रकरणावर मांडलं आहे.

हेही वाचा : Badlapur Protest : बदलापूरच्या आंदोलनाचा मुंबई लोकल व एक्सप्रेसला फटका, रेल्वेगाड्या ‘या’ मार्गावर धावतायत, मुंबईकरांसाठी काय व्यवस्था?

Badlapur School Case
Badlapur School Case : सचिन गोस्वामी यांची पोस्ट

हेही वाचा : “माणूस म्हणून नक्की कुठे जातोय आपण?” बदलापूर अत्याचार प्रकरणावर भडकली मृण्मयी; अक्षय केळकर म्हणाला, “कुठल्या तोंडाने…”

मराठी कलाकारांच्या संतप्त प्रतिक्रिया

Badlapur School Case
Badlapur School Case – अभिजीत केळकर

दरम्यान, बदलापूर प्रकरणावर ( Badlapur School Case ) नेहा शितोळे, मृण्मयी देशपांडे, अभिजीत केळकर, शिवाली परब, प्रसाद ओक या मराठी कलाकारांनी सुद्धा पोस्ट शेअर करत आपलं मत मांडलं आहे. याशिवाय या कलाकारांनी संताप व्यक्त करत लवकरात लवकर आरोपींना शिक्षा व्हावी अशी मागणी देखील केली आहे.

Story img Loader