‘बाईपण भारी देवा’ या चित्रपटाची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर रेकॉर्ड ब्रेक कमाई करत कोटींचा गल्ला जमावला आहे. केदार शिंदे दिग्दर्शित ‘बाईपण भारी देवा’चे अनेक दिग्गजांनी कौतुक केले आहे. अलीकडेच या चित्रपटाच्या संपूर्ण टीमने हिंदी रिअॅलिटी शो ‘इंडियाज बेस्ट डान्सर’मध्ये हजेरी लावली होती.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
‘इंडियाज बेस्ट डान्सर’मध्ये मराठी बॉलीवूड अभिनेत्री सोनाली बेंद्रे परीक्षक म्हणून जबाबदारी सांभाळत आहे. ‘बाईपण भारी देवा’ टीमच्या आगमनाने सोनालीचा उत्साह द्विगुणित झाल्याचे पाहायला मिळायला आहे. या संपूर्ण टीमचे आणि चित्रपटातील मुख्य अभिनेत्रींचे कौतुक करण्यासाठी सोनालीने खास इन्स्टाग्राम पोस्ट सुद्धा शेअर केली होती. वंदना गुप्ते, सुचित्रा बांदेकर, दीपा परब, शिल्पा नवलकर या मुख्य अभिनेत्रींसह केदार शिंदे या भागात उपस्थित होते. या वेळी अभिनेत्रींनी ‘बाईपण भारी देवा’ चित्रपटामधील मंगळागौरीची झलक सर्वांना दाखवली.
हेही वाचा : “…म्हणून मी आनंद दिघेंची भूमिका साकारली नाही”; मंगेश देसाईंनी कारण केलं स्पष्ट, म्हणाले…
‘बाईपण…’च्या अभिनेत्रींनी सादर केलेला पारंपरिक मंगळागौरीचा खेळ पाहून उपस्थित प्रेक्षकवर्ग भारावल्याचे पाहायला मिळाले. सोनाली बेंद्रेलाही मंगळागौरीच्या गाण्यांवर थिरकण्याचा मोह आवरला नाही. तिने या अभिनेत्रींचे भरभरून कौतुक केले. सोनी वाहिनीने या कार्यक्रमातील काही निवडक क्षण इन्स्टाग्राम पेजवर शेअर केले आहेत. यावर नेटकऱ्यांनी या व्हिडीओवर “मराठी पाऊल पडते पुढे”, “सुकन्या ताई तुम्हाला मिस केलं या डान्समध्ये”, “या टीमचा अभिमान वाटतोय” अशा विविध प्रतिक्रिया दिल्या आहे.
दरम्यान, ‘बाईपण भारी देवा’ या चित्रपटासाठी दिग्दर्शक केदार शिंदे यांचे मनोरंजनसृष्टीतील अनेक दिग्गजांनी कौतुक केले. यापूर्वी ‘सैराट’ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी करत १०० कोटींचा गल्ला जमावला होता. त्यामुळे‘बाईपण भारी देवा’ हा चित्रपट ‘सैराट’चा रेकॉर्ड मोडणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.