गेल्या काही महिन्यांपासून मनोरंजन सृष्टीत लग्नाचा माहोल सुरू आहे. अनेक आघाडीचे कलाकार गेल्यावर्षी विवाह बंधनात अडकले. तर आता यात आणखी एका अभिनेत्रीची भर पडली आहे. ‘बालिका वधू’ फेम अभिनेत्री हंसी परमार नुकतीच विवाहबद्ध झाली आहे. तिच्या लग्नाचे फोटो सध्या सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होताना दिसत आहेत.
ग्वाल्हेरच्या आकाश श्रीवास्तव याच्याशी तिने लग्नगाठ बांधली. त्यांचा हा विवाह सोहळा अगदी थाटामाटात ग्वाल्हेर येथे संपन्न झाला. त्या लग्न सोहळ्याला दोघांचे कुटुंबीय आणि मित्रपरिवार उपस्थित होते. लग्नाच्या वेळी हंसीने लाल रंगाचा घागरा परिधान केला होता तर आकाश ने सोनेरी आणि लाल रंगाची शेरवानी परिधान केली होती. सोबत असताना डोक्यावर लाल रंगाचा फेटा ही बांधला होता.
आणखी वाचा : Video: आधी टॉवेल गुंडाळून कॅमेऱ्यासमोर केला डान्स अन् मग… श्रद्धा आर्याचा ‘तो’ व्हिडीओ व्हायरल
काही वर्षांपूर्वी हंसी गुजरातमधून मुंबईत अभिनय क्षेत्रात आपला नशीब आजमावायला आली. मुंबईत ती ज्या ठिकाणी राहत होती त्याच्या जवळच आकाश राहत होता. या दरम्यान दोघांमध्ये भेटीगाठी वाढल्या आणि त्यांच्या छान मैत्री झाली. त्या मैत्रीतूनच त्यांच्यात प्रेम फुलत गेलं आणि त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला.
हेही वाचा : “अखेर देवाने माझी इच्छा ऐकली…” लग्नाच्या १० वर्षांनी ‘बालिका वधू’ फेम अभिनेत्री होणार आई
मध्य प्रदेशातील ग्वाल्हेरची सून झाल्यानंतर आता हंसी खुश आहे. ती मुलगी गुजरातची असल्यामुळे तिला ग्वाल्हेरमधील संस्कृती परंपरा माहित नव्हत्या. पण आता तिला त्याही कळू लागल्या आहेत आणि त्या ती जपत आहे. यापूर्वी ती कधीही ग्वाल्हेरला आली नव्हती असंही तिने सांगितलं. आता एकमेकांशी लग्न केल्यानंतर दोघेही जण खुश आहेत. सोशल मीडियावरून तिचे चाहते तिच्यावर अभिनंदनचा वर्षाव करताना दिसत आहेत.