लोकप्रिय टीव्ही मालिका ‘बालवीर’मध्ये मुख्य भूमिका साकारून लोकप्रिय झालेल्या अभिनेत्याने २४ व्या वर्षी लग्न केलं आहे. देव जोशी असं या अभिनेत्याचं नाव आहे. देवने मंगळवारी (२५ फेब्रुवारी २०२५) नेपाळमध्ये लग्न केलं. त्याने त्याच्या लग्नाचे काही फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.

देव जोशीच्या पत्नीचं नाव आरती आहे. देवने त्याच्या मेहंदीचे, हळदीचे व लग्नाचे फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. देव व त्याचे कुटुंबीय भारतातून वरात घेऊन नेपाळला गेले होते. तिथे आरतीच्या कुटुंबियांनी त्यांचं स्वागत केलं होतं. त्या स्वागताचे फोटोदेखील देवने शेअर केले होते.

देव व आरती दोघेही विवाहबंधनात अडकले आहेत. लग्नात देवने लाल रंगाचा लेहेंगा घातला होता, तर देवने आयव्हरी रंगाची शेरवानी परिधान केली होती. लग्नात ते दोघेही खूप सुंदर दिसत होते. देवने लग्नाचे फोटो शेअर केल्यावर त्याला चाहते नवीन प्रवासासाठी शुभेच्छा देत आहेत.

दरम्यान, देव व आरती यांचा साखरपुडा जानेवारी महिन्यात नेपाळमध्ये झाला होता. त्यानंतर एका महिन्याने त्यांचं लग्न झालं.

देव जोशीने बाल कलाकार म्हणून ‘महिमा शनि देव की’ मधून टीव्ही इंडस्ट्रीत पदार्पण केलं होतं. मग त्याने ‘काशी- अब ना रहे तेरा कागज कोरा’ मध्ये लहान शौर्याची भूमिका साकारली होती. मात्र ‘बालवीर’ आणि त्याचा दुसरा भाग ‘बालवीर रिटर्न्स’ मध्ये मुख्य भूमिका साकारून देव खूप लोकप्रिय झाला. त्याने चंद्रशेखर आझाद यांची बालपणीची भूमिकाही साकारली होती.

Story img Loader