Aasiya Kazi Gulshan Nain Wedding: ‘बंदिनी’ या लोकप्रिय मालिकेत मुख्य भूमिका साकारून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री आसिया काझी सध्या तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. आसिया आंतरधर्मीय लग्न करत आहे. ती व तिचा बॉयफ्रेंड अभिनेता गुलशन नैन लवकरच लग्नबंधनात अडकणार आहेत. आंतरधर्मीय लग्नासाठी त्यांच्या कुटुंबाचा विरोध होता, मात्र आता ते या लग्नासाठी तयार झाले आहेत.

आसिया व गुलशन आठ वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत. आता त्यांनी लग्नाचा निर्णय घेतला आहे. दोघेही आपल्या आयुष्यातील या नवीन प्रवासासाठी खूप उत्सुक आहेत. आसिया-गुलशन २९ नोव्हेंबरला खासगी सोहळ्यात लग्नगाठ बांधणार आहेत. एबीपी लाइव्हने हे वृत्त दिले आहे.

हेही वाचा – “माझे ख्रिश्चन वडील ६ वेळा वैष्णोदेवीला गेले, तर मुस्लीम भाऊ…”; बॉलीवूड अभिनेत्याचा कुटुंबाबत खुलासा

कुटुंबाचा विरोध, मात्र सोडली नाही साथ

आसिया व गुलशन यांच्या नात्याला त्यांच्या कुटुंबियांचा विरोध होता. दोघांचे धर्म वेगळे असल्याने त्यांच्या कुटुंबियांना त्यांचं नातं मान्य नव्हतं. त्यांच्या कुटुंबियांनी खूप विरोध केला, मात्र गुलशन व आसियाने एकमेकांची साथ सोडली नाही. आता दोघेही लग्नबंधनात अडकणार आहे. त्यांच्या लग्नाला कुटुंबीय, काही नातेवाईक व जवळचे मित्र सहभागी होणार आहेत.

हेही वाचा – वडील सुपरस्टार, स्वतःही केले हिट चित्रपट; आता जग फिरतोय ‘हा’ अभिनेता, लोकांच्या शेतातही करतो काम

आसिया व गुलशन यांची पहिली भेट सेलिब्रिटी क्रिकेट लीगमध्ये झाली होती. तिथेच दोघांची मैत्री झाली आणि नंतर ते प्रेमात पडले. हे दोघेही आठ वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये आहेत. आता या महिन्याच्या शेवटी ते लग्न करणार आहेत.

Aasiya Kazi Gulshan Nain
गुलशन नैन व आसिया काझी (फोटो – इन्स्टाग्राम)

हेही वाचा – गावी गेल्यावर १ तास थांबले, अनफॉलो केलं अन्..; सूरजच्या गावी अंकिताला काय खटकलं? सांगितला संपूर्ण घटनाक्रम

आसिया काझीच्या गाजलेल्या मालिका

आसिया काझी ही लोकप्रिय टीव्ही अभिनेत्री आहे. ‘बंदिनी’ या मालिकेत तिने मुख्य भूमिका केली होती. रोनित रॉय, मृणाल जैन, शार्दूल पंडित, रसिका, जोशीसारखे कलाकार या मालिकेत होते. तसेच आसियाने इतरही अनेक गाजलेल्या मालिकांमध्ये काम केलं आहे. ‘माटी की बन्नो’, ‘हिटलर दीदी’, ‘बालिका वधू’, ‘ये है आशिकी’ या तिच्या मालिका आहेत. गुलशनने ‘शौर्य और अनोखी की कहानी’ मध्ये काम केलं आहे. सध्या दोघेही त्यांच्या ओटीटी प्रोजेक्ट्सच्या शूटिंगमध्ये व्यग्र आहेत.

Story img Loader