‘बिग बॉस मराठी’चं चौथं पर्व रंजक दिवसेंदिवस होत चाललं आहे. पहिल्या दिवसापासूनच बिग बॉसने सदस्यांना आश्चर्याचे धक्के द्यायला सुरुवात केली आहे. आता ‘बिग बॉस’च्या घरात मोठा ट्विस्ट येणार आहे. नवीन चार सदस्यांची ‘बिग बॉस’च्या घरात वाइल्ड कार्ड एन्ट्री होणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘कलर्स मराठी’च्या ऑफिशिअल सोशल मीडियावरुन एक प्रोमो व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओमध्ये घरात चार वाइल्ड कार्ड एन्ट्री होणार असल्याची घोषणा बिग बॉस करताना दिसत आहेत. घरातील सदस्यांचे खरे चेहरे आता कुठे स्पर्धकांना दिसत आहेत. त्यातच आता चार नवीन सदस्यांची घरात एन्ट्री होत असल्याने ‘बिग बॉस’च्या घरातील स्पर्धकांच्या चेहऱ्यावरील रंग उडताना दिसणार आहेत.

हेही वाचा>> Video: सोफ्यावर बसून अंकिता लोखंडेचा हॉट डान्स, नेटकरी म्हणतात “पवित्र रिश्ता…”

हेही वाचा>> Dishyam 2 Box Office Collection: अजय देवगणचा ‘दृश्यम २’ सुपरहिट, पार केला १०० कोटींचा आकडा

‘बिग बॉस मराठी’ चौथ्या पर्वाच्या येणाऱ्या भागात शनिवार व रविवारी चार सदस्य वाइल्ड कार्डद्वारे घरात एन्ट्री घेणार आहेत. बिग बॉसच्या इतिहासात पहिल्यांदाच चार सदस्य वाइल्ड कार्डमधून घरात प्रवेश करणार आहेत. घरातील सदस्यांसह बिग बॉसने प्रेक्षकांनाही आश्चर्याचा धक्का दिला आहे. वाइल्ड कार्डद्वारे घरात एन्ट्री घेणारे सदस्य कोण असतील याबाबत सदस्यांसह प्रेक्षकांनाही उत्सुकता आहे.

पाहा व्हिडीओ –

हेही वाचा>> “मुलींबरोबर खेळू नका…” घटस्फोटाच्या चर्चांनंतर मानसी नाईकची ‘ती’ पोस्ट चर्चेत

‘बिग बॉस’च्या घरात याआधी स्नेहलता वसईकरने वाइल्ड कार्डद्वारे प्रवेश केला होता. आता चार सदस्यांनी एन्ट्री केल्यानंतर घरातील समीकरणं किती बदलणार हे पाहणं रोमांचक ठरणार आहे. ५० दिवस उलटल्यानंतर आता बिग बॉस मराठीचं पर्व आणखीनच रंजक होत चाललं आहे.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bbm 4 four contestant wild card entry in bigg boss marathi house know the details kak