‘बिग बॉस मराठी’चं चौथं पर्व दिवसेंदिवस रंजक होत चाललं आहे. खेळात टिकून राहण्यासाठी स्पर्धक टास्कदरम्यानही आक्रमक होताना दिसत आहेत. गेल्या आठवड्यातील कॅप्टन्सी टास्क अनिर्णित राहिल्याने बिग बॉसच्या घरातील यंदाचा आठवडा कॅप्टनविना जाणार आहे. त्यामुळे पुढच्या आठवड्यातील कॅप्टन्सी पदासाठी सदस्यांमध्ये टास्क खेळवण्यात आला.
‘बिग बॉस मराठी’च्या घरात रंगलेल्या हत्ती-मुंगीच्या कॅप्टन्सी टास्कमध्ये अमृता धोंगडे अधिक आक्रमक झालेली दिसली. या टास्कमध्ये हत्तीच्या गळ्यात घंटा बांधणारी टीम विजयी होणार होती. दोन्ही टीमला दोरी बांधलेली घंटा हत्तीच्या गळ्यात अडकवायची होती. परंतु, टास्कदरम्यान दोन्ही टीमने एकमेकांच्या घंटा बांधलेल्या दोऱ्या ‘बिग बॉस’च्या घरातील जेलमध्ये टाकल्या. त्यानंतर अमृता देशमुखने घरातील लांब काठीच्या साहाय्याने त्या दोऱ्या काढण्याचा प्रयत्न केला. परंतु, बिग बॉसने घरातील प्रॉपर्टी न वापरण्याची ताकीद दिली.
हेही वाचा >> समीर चौगुलेंच्या हास्यजत्रेतील ‘त्या’ डायलॉगवर मुंबई पोलिसांनी बनवला भन्नाट मीम, पोस्ट शेअर करत म्हणाले…
हेही वाचा >> ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम गौरव मोरेला मिळालं हिंदी जाहिरातीत काम, व्हिडीओ पाहिलात का?
अमृता धोंगडेने त्यानंतर आक्रमक रुप धारण करत दबंग स्टाइलने थेट बिग बॉसच्या घरातील जेल तोडण्याचा प्रयत्न केला. आधी अमृताने हाताने जेलचे खांब काढण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर तिने लाथ मारुन जेल तोडले. अमृताने केलेल्या या चुकीची शिक्षा बिग बॉसने तिला टास्क संपल्यानंतर सुनावली. घरातील प्रॉपटीचे नुकसान केल्यामुळे बिग बॉसने अमृता धोंगडेची दोन आठवड्यांसाठी कॅप्टन्सी पदाची उमेदवारी रद्द केली आहे.
आणखी वाचा >> रश्मिका मंदाना व विजय देवरकोंडाने गुपचूप उरकलं लग्न? फोटो व्हायरल
‘बिग बॉस’च्या घरात दोन टीममध्ये पार पडलेला हा टास्कही अनिर्णित राहिल्याने आता स्पेशल पॉवर मिळालेले किरण माने या टास्कचा निकाल देणार आहेत. किरण माने येणाऱ्या भागात बिग बॉसच्या घरात पुन्हा प्रवेश करुन सदस्यांना आश्चर्याचा धक्का देणार आहेत.