‘तुझेच मी गीत गात आहे’ ही मालिका ‘स्टार प्रवाह’वरील लोकप्रिय मालिकांपैकी एक आहे. या मालिकेतील नवनवीन ट्वीस्टमुळे प्रेक्षकांना चांगलं खिळवून ठेवलं आहे. तसेच काही दिवसांपूर्वी पिहूचा खरा बाबा म्हणजेच शुभंकरची एन्ट्री झाल्यामुळे मालिका एका रंजन वळणावर येऊन पोहोचली आहे. त्यामुळे ‘तुझेच मी गीत गात आहे’ मालिकेला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. टीआरपीच्या यादीतही ही मालिका पहिल्या पाचमध्ये तग धरून आहे. अशा या मालिकेच्या पडद्यामागचा एक व्हिडीओ सध्या व्हायरल झाला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा – Video: राष्ट्रगीताला चुकीच्या पद्धतीनं उभी राहिल्यामुळे करीना कपूर ट्रोल; नेटकरी म्हणाले, “लज्जास्पद…”

‘तुझेच मी गीत गात आहे’ मालिका सध्या चांगलीच चर्चेत आली आहे. कारण या मालिकेत नुकताच नवा ट्वीस्ट आला आहे. या ट्वीस्टची गेले कित्येक महिने प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत होते. अखेर तो क्षण आला. मल्हारसमोर स्वराज मुलगी असल्याचं सत्य उघड झालं आहे. आता मल्हार स्वराला कसा स्वीकारतोय हे येत्या भागांमध्ये पाहायला मिळणार आहे. अशातच मालिकेतील स्वरा म्हणजेच अवनी तायवाडेनं सेटवरील मज्जा-मस्तीचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.

हेही वाचा – “माझी कंबर…” साडी नेसण्याच्या पद्धतीवरून ट्रोल करणाऱ्यांना मराठमोळ्या अभिनेत्रीचं सडेतोड उत्तर, म्हणाली, “स्त्रीने काहीही परिधान केलं तरी…”

या व्हिडीओमध्ये मालिकेतील दोन्ही अवनी शुभंकर म्हणजे अभिनेता हार्दिक जोशीबरोबर मज्जा-मस्ती करताना पाहायला मिळत आहेत. हार्दिक दोघींना हाताला लटकवून फिरवताना दिसत आहे. असा हा पडद्यामागचा व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ पाहून हार्दिकची पत्नी अक्षया देवधरने ‘क्यूट’ अशी प्रतिक्रिया दिली आहे.

हेही वाचा – “कॉलेजमध्ये असताना…”, तेजश्री प्रधानचा पहिल्या प्रपोजबद्दल खुलासा, म्हणाली…

हेही वाचा – ‘प्रेमाची गोष्ट’ फेम तेजश्री प्रधानचं पहिलं क्रश कोण होतं? जाणून घ्या

दरम्यान, आता मालिकेत स्वराज मुलगी असल्याचं सत्य उघड झालं असलं तरी अजून शुभंकर पिहूची मुलगी असल्याचं सत्य मल्हार समोर आलेलं नाही. त्यामुळे हे सत्य मालिकेत कधी उलगडणार, हे पाहणं देखील उत्सुकतेचं ठरणार आहे.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Behind the scenes video of tuzech mi geet gaat aahe marathi serial pps
Show comments