‘भाभीजी घर पर है’ मालिकेतील कलाकार खूप लोकप्रिय आहेत. लोकांना खळखळून हसवणाऱ्या या मालिकेतील एका अभिनेत्याने धक्कादायक खुलासा केला आहे. १३ व्या वर्षी आपल्यासोबत लैंगिक छळ झाला होता, असं त्याने सांगितलं आहे. या अभिनेत्याचं नाव सानंद वर्मा आहे. मालिकेत सानंद ‘अनोखे लाल सक्सेना’ हे पात्र साकारतो.

‘टाईम्स नाऊ’ला दिलेल्या मुलाखतीत सानंदने खुलासा केला की लहानपणी तो क्रिकेट खेळायला जायचा तिथे एका तरुणाने त्याचा लैंगिक छळ केला होता. ही आयुष्यातील एक वाईट आठवण आहे जी कधीच विसरू शकत नाही, असंही तो म्हणाला. “क्रिकेट सामन्यादरम्यान माझ्याबरोबर हे घडलं. मी १३ वर्षांचा होतो आणि मला क्रिकेटपटू व्हायचं होतं. मी पाटण्यातील क्रिकेट अकादमीत जायचो. तिथे एक मुलगा होता जो माझं लैंगिक शोषण करायचा. त्यामुळे मी खूप घाबरलो आणि तिथून पळून गेलो. तेव्हापासून मी क्रिकेटपासून दूर राहतो,” असं सानंद म्हणाला.

akshay kumar
‘हाऊसफुल ५’ चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान अक्षय कुमारच्या डोळ्याला दुखापत
Viral Trend Chastity Belts:
Chastity Belt: योनी शुचिता पट्ट्याचा इतिहास आणि त्यामागील…
mla sanjay rathod upset over baseless news spread against him by media
“मन दुखावले, जिव्हारी लागले…” आमदार संजय राठोड असे का म्हणाले?
rashmika mandanna salman khan
“मी आजारी आहे समजल्यावर…” रश्मिका मंदानाने सांगितला सलमान खानबरोबर काम करतानाचा ‘तो’ किस्सा, म्हणाली, “स्वप्न…”
sridevi akshay kumar
“अक्षय कुमारवर श्रीदेवी चिडल्या होत्या…”, प्रसिद्ध दिग्दर्शकाने सांगितला किस्सा; म्हणाला, “तो घाबरायचा…”
Anju Bhavnani
दीपिका-रणवीरची लेक झाली तीन महिन्यांची; आजी अंजू भवनानी यांनी नातीसाठी केली ‘ही’ गोष्ट, पाहा फोटो
Maharashtrachi hasyajatra fame Namrata Sambherao praises husband yogesh sambherao
दोन महिन्यांचा मुलगा, चित्रपटाची ऑफर आली अन्…; ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम नम्रता संभेरावने सांगितला ‘तो’ किस्सा, म्हणाली, “नवऱ्याने…”
Sudhir Mungantiwar On Karnataka
Sudhir Mungantiwar : “कर्नाटक सरकारला याचा हिशेब द्यावा लागेल”; सुधीर मुनगंटीवार यांचा इशारा, कारण काय?

पती फोटोग्राफर तर सासरे मंत्री, स्वत: राजकुमारी असलेली अभिनेत्री अभिनय सोडून रमली संसारात, पाहा Photos

“लहानपणी माझ्यासोबत जे काही घडलं ते वाईट आहे. ही एक भयंकर आठवण आहे, जी मी विसरू शकत नाही. याआधी माझ्यासह अनेक वाईट गोष्टी घडल्या आहेत. त्यामुळे जेव्हा एखादी व्यक्ती इतका त्रास सहन करते तेव्हा तिच्यासाठी लहान गोष्टींमुळे होणारा त्रास महत्त्वाचा नसतो,” असं सानंद म्हणाला.

“मी खरेदी केलेली संपत्ती माझ्याच नावावर”, शर्मिला टागोर यांची माहिती; म्हणाल्या, “इस्लाममध्ये मृत्यूपत्र करण्याची…”

सानंदच्या कामाबद्दल बोलायचं झाल्यास तो जवळजवळ १० वर्षांपासून अभिनयक्षेत्रात सक्रिय आहे. त्याने मालिकांसह चित्रपटांमध्येही काम केलं आहे. तो ‘सीआयडी’, ‘लापतागंज’, ‘गुपचूप’ यांसारख्या मालिकांमध्ये काम केले आहे. याशिवाय तो ‘रेड’, ‘मर्दानी’, ‘बबली बाउंसर’, ‘छिछोरे’ आणि ‘मिशन रानीगंज’ यांसारख्या चित्रपटांचा भाग राहिला आहे.

Story img Loader