छोट्या पडद्यावरील ‘भाभीजी घर पर है’ ही लोकप्रिय मालिका आहे. या कार्यक्रमातूनच अभिनेत्री विदिशा श्रीवास्तव घराघरात पोहोचली. या मालिकेत विदिशा गोरी मॅम हे पात्र साकारत आहे. विदिशा लवकरच आई होणार आहे. विदिशा गरोदर असल्याची गुडन्यूज समजल्यानंतर तिचे चाहतेही आनंदी आहेत.

अभिनेत्री नेहा पेंडसेने ‘भाभाजी घर पर है’ मधून एग्झिट घेतल्यानंतर विदिशाने मालिकेतून एन्ट्री घेतली होती. विदिशाच्या निकटवर्तीयांनी ‘नवभारत टाइम्स’शी बोलतना तिच्या गरोदरपणाबाबत माहिती दिली आहे. “विदिशा प्रसुतीनंतर तीन महिन्याचा ब्रेक घेणार आहे. त्यामुळे तिचे काही एपिसोड आधीच शूट करण्यात आले आहेत”, असं त्यांनी सांगितलं.

हेही वाचा>> “…तर कार्यक्रमात धुडगूस घालू” एमसी स्टॅनच्या कॉन्सर्टला मनसेचा विरोध, नेमकं प्रकरण काय?

विदिशा अभिनेत्री असण्याबरोबरच एक मॉडेलही आहे. तिने दाक्षिणात्य चित्रपटांत काम केलं आहे. तेलुगु चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी विदिशा एक आहे. २००५ साली तिने तेलुगु चित्रपटातून पदार्पण केलं होतं. स्टार प्लस वरील ये हे मोहब्बते मालिकेतून तिने छोट्या पडद्यावर पदार्पण केलं होतं.

हेही वाचा>> मनोज बाजपेयीला “नशेडी” म्हणणं पडलं महागात, बॉलिवूड अभिनेत्यावर अटकेची टांगती तलवार

विदिशाने २०१६ मध्ये बॉयफ्रेंड सायक पॉलशी गुपचूप लग्न केलं होतं. लग्नाच्या सात वर्षांनंतर आता ती आई होणार आहे.

Story img Loader