‘झी मराठी’ वाहिनीवरील ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ या मालिकेतील अद्वैत म्हणजे अभिनेता अजिंक्य ननावरे याचं नुकतंच लग्न झालं. अभिनेत्री शिवानी सुर्वेबरोबर अजिंक्यने लग्नगाठ बांधली. आता ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’मधील नेत्रा म्हणजे अभिनेत्री तितीक्षा तावडे लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. काल, गुरुवारी पहिल्या केळवणाचा फोटो शेअर करत अभिनेत्रीने चाहत्यांना ही आनंदाची बातमी दिली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अभिनेत्री तितीक्षा तावडे ‘दृश्यम २’ फेम अभिनेता सिद्धार्थ बोडकेबरोबर लग्न करणार आहे. गेल्या काही दिवसांपासून या दोघांच्या फोटोवर चाहते विचारत होते की, कधी लग्न करणार? अशात दोघांनी चाहत्यांना ही आनंदाची बातमी दिली आहे. तितीक्षा व सिद्धार्थचं लग्न ठरताच पंडित अतुलशास्त्री भगरे गुरुजी यांची लेक अभिनेत्री अनघा अतुलने सोशल मीडियावर आनंद व्यक्त केला आहे.

हेही वाचा – अभिषेक घोसाळकर गोळीबार प्रकरणावर मराठी अभिनेत्रीची संतप्त प्रतिक्रिया, म्हणाली, “आपण किती…”

अभिनेत्री अनघा अतुलने इन्स्टाग्राम स्टोरीवर तितीक्षा व सिद्धार्थच्या केळवणाची पोस्ट शेअर केली आहे. अनघा ही पोस्ट शेअर करत म्हणाली, “चला पुढच्या केळवणाची तयारी करायची आहे मला.” दरम्यान, अनघा सिद्धार्थ बोडकेची खूप चांगली मैत्रीण आहे. नेहमी अनघा सिद्धार्थबरोबर फोटो, व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असते.

हेही वाचा – मराठीतील लोकप्रिय अभिनेत्री, लेखिकेबरोबर घडला फसवणुकीचा प्रकार, प्रसंग सांगत म्हणाली, “मी याला बळी…”

अनघाच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, गेल्यावर्षी सप्टेंबर महिन्यात तिची लोकप्रिय मालिका ‘रंग माझा वेगळा’ने प्रेक्षकांचा निरोप घेतला. या मालिकेत अनघाने साकारलेली श्वेता प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस पडली होती. त्यामुळे अनघाला पुन्हा एकदा नव्या भूमिकेत पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक होते. गेल्या महिन्यात तिची ‘कलर्स मराठी’वरील ‘पिरतीचा वनवा उरी पेटला’ या लोकप्रिय मालिकेत एन्ट्री झाली. तिने या मालिकेत मनालीची भूमिका साकारली आहे.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bhagare guruji daughter anagha atul became happy for titeeksha tawde and siddharth bodke pps