पंडित अतुलशास्त्री भगरे गुरुजी यांची लेक अभिनेत्री अनघा अतुल ही नेहमी चर्चेत असते. तिच्या व्यावसायिक व वैयक्तिक आयुष्याविषयी नेहमी चर्चा रंगलेली असते. गेल्या वर्षी अनघाने भाऊ अखिलेश भगरेच्या साथीने हॉटेल व्यवसायात पाऊल ठेवलं. पुण्यात ‘वदनी कवळ’ नावाचं हॉटेल सुरू केलं. या हॉटेलची चर्चा नेहमी होतं असते. अशातच आता अनघाचा भाऊ लवकरच लग्नाच्या बेडीत अडकणार असल्याचं समोर आलं आहे. अभिनेत्रीने स्वतः ही आनंदाची बातमी चाहत्यांबरोबर शेअर केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

हेही वाचा – Video: संतोष जुवेकरने आई-वडिलांसाठी खरेदी केली आलिशान गाडी, व्हिडीओ झाला व्हायरल

अभिनेत्री अनघा अतुलचा भाऊ अखिलेशच्या लग्नाची नुकतीच सुपारी फुटली आहे. याचा फोटो अनघाने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. या फोटोवर अनघाने लिहिलं आहे की, चला सुपारी फुटली एकदाची. अभिनंदन अखिलेश आणि वैष्णवी. तुम्हा दोघांना खूप सारं प्रेम. या फोटोमध्ये अनघाचा भाऊ अखिलेशसह त्याची होणारी बायको वैष्णवी दिसत आहे.

हेही वाचा – आयरा खान-नुपूर शिखरेचे इंडोनेशियातील हनिमूनचे फोटो व्हायरल, आमिर खानची लेक पोस्ट शेअर करत म्हणाली…

दरम्यान, अनघाच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, गेल्यावर्षी सप्टेंबर महिन्यात तिची लोकप्रिय मालिका ‘रंग माझा वेगळा’ने प्रेक्षकांचा निरोप घेतला. या मालिकेत अनघाने साकारलेली श्वेता प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस पडली होती. त्यामुळे अनघाला पुन्हा एकदा नव्या भूमिकेत पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक होते. गेल्या महिन्यात तिची ‘कलर्स मराठी’वरील ‘पिरतीचा वनवा उरी पेटला’ या लोकप्रिय मालिकेत एन्ट्री झाली. तिने या मालिकेत मनालीची भूमिका साकारली आहे.