मराठी कलाविश्वातील अनेक सेलिब्रिटी येत्या काही दिवसांत लग्नबंधनात अडकणार आहेत. अलीकडेच ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ फेम अभिनेत्री तितीक्षा तावडेने प्रेमाची जाहीर कबुली देत लवकरच विवाहबंधनात अडकणार असल्याचं चाहत्यांना सांगितलं. मराठीसह बॉलीवूडमध्ये ठसा उमटवणारा लोकप्रिय अभिनेता सिद्धार्थ बोडकेशी तितीक्षा लग्नगाठ बांधणार आहे. गेली अनेक वर्षे ते एकमेकांना डेट करत आहेत.

तितीक्षा-सिद्धार्थचे एकत्र फोटो पाहून या दोघांच्या डेटिंगच्या चर्चा अनेक दिवसांपासून सोशल मीडियावर चालू होत्या. अखेर दोन दिवसांपूर्वी अभिनेत्रीने इन्स्टाग्राम पोस्ट शेअर करत प्रेमाची जाहीर कबुली दिली. लवकरच लग्नबंधनात अडकणार असल्याने या दोघांच्या केळवणाला सुरुवात झालेली आहे. तितीक्षाने अद्याप लग्नाची तारीख जाहीर केलेली नसली तरीही, फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात अभिनेत्री लग्नबंधनात अडकणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत.

हेही वाचा : Video : आकर्षक सजावट, झोपाळा अन्…; ऐश्वर्या नारकर यांचं प्रशस्त घर पाहिलंत का? व्हिडीओ शेअर करत दाखवली झलक

तितीक्षा-सिद्धार्थचं पहिलं केळवण भगरे गुरुजींच्या लेकीने म्हणजेच अनघा अतुलने केलं. या दोघांचा गोड फोटो शेअर करत अभिनेत्रीने त्याला “केळवण…माझे पाहुणे सिद्धार्थ बोडके आणि तितीक्षा तावडे” असं कॅप्शन दिलं आहे. अनघा, तितीक्षा व सिद्धार्थ हे तिघेही एकमेकांचे फार आधीपासून चांगले मित्र आहेत. त्यामुळे आपल्या लाडक्या मित्रांच्या लग्नासाठी अनघा गेल्या काही दिवसांपासून फारच उत्सुक असल्याचं पाहायला मिळत आहे.

हेही वाचा : Video : अखेर अर्जुनसमोर येणार साक्षी-चैतन्यच्या नात्याचं सत्य! ‘ठरलं तर मग’च्या विशेष भागात काय घडणार? पाहा प्रोमो

anagha atul
अनघा अतुलने शेअर केला फोटो

दरम्यान, तितीक्षा तावडे व सिद्धार्थ बोडके यांनी ‘तू अशी जवळी रहा’ या मालिकेत एकत्र काम केलं होतं. सध्या अभिनेत्री ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ या मालिकेत नेत्रा ही भूमिका साकारत आहे. तर, सिद्धार्थ नुकताच ‘श्रीदेवी प्रसन्न’ या चित्रपटात झळकला होता.