‘रंग माझा वेगळा’ मालिकेने सप्टेंबर २०२३ मध्ये प्रेक्षकांचा निरोप घेतला. या मालिकेने प्रत्येकाच्या मनात एक वेगळं स्थान निर्माण केलं होतं. कार्तिक व दीपाच्या जोडीने अल्पावधीतच प्रेक्षकांची पसंती मिळवली होती. या मालिकेत अभिनेत्री अनघा अतुलने श्वेता हे खलनायिकेचं पात्र साकारलं होतं. या मालिकेमुळे अनघा घराघरांत लोकप्रिय झाली. अभिनेत्री पंडित अतुलशास्त्री भगरे गुरुजी यांची लेक आहे. छोट्या पडद्यावर अनघाने स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यामुळे अनघाला तिच्या करिअरमध्ये एक मोठी संधी मिळाली आहे.

‘कौन बनेगा करोडपती’ या लोकप्रिय कार्यक्रमाचा नवीन सीझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘सोनी टीव्ही’वर हा शो प्रसारित केला जाणार आहे. या नव्या सीझनचा टीझर नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला अन् यामध्ये अभिनेत्री अनघा अतुलने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. KBC च्या जाहिरातीमध्ये यंदा तिची वर्णी लागली आहे. यामुळे अनघाला थेट बॉलीवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांच्याबरोबर काम करण्याची संधी मिळाली.

mla sanjay rathod upset over baseless news spread against him by media
“मन दुखावले, जिव्हारी लागले…” आमदार संजय राठोड असे का म्हणाले?
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
Rajesh Khanna, sanjeev kumar
राजेश खन्नांपेक्षा शत्रुघ्न सिन्हा, संजीव कुमार वाईट होते, असं का म्हणाल्या शबाना आझमी?
tharala tar mag kalpana thrown out sayali from house arjun emotional breakdown
ठरलं तर मग : कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचं भांडं फुटलं! सासुबाईंनी सायलीला घराबाहेर काढलं, अर्जुनला अश्रू अनावर…; पाहा प्रोमो
rashmika mandanna salman khan
“मी आजारी आहे समजल्यावर…” रश्मिका मंदानाने सांगितला सलमान खानबरोबर काम करतानाचा ‘तो’ किस्सा, म्हणाली, “स्वप्न…”
nana patekar amitabh bachchan KBC 16
नातवाच्या जन्मानंतर अमिताभ बच्चन मिठाई घेऊन आले अन्…, नाना पाटेकरांनी सांगितला किस्सा; ‘ती’ भेटवस्तू अजूनही ठेवलीये जपून
najma heptulla on indira gandhi emergency
Indira Gandhi: “इंदिरा गांधींना आणीबाणीचा पश्चात्ताप होत होता”, नजमा हेपतुल्ला यांचा आत्मचरित्रात दावा; विश्वासू व्यक्तींबाबतही होती तक्रार!
kareena kapoor lal singh chadhha aamir khan
‘लाल सिंग चड्ढा’च्या अपयशाने निराश झाला होता आमिर खान, करीना कपूर खानने केला खुलासा; म्हणाली…

हेही वाचा : ‘धर्मवीर २’च्या प्रदर्शनाची तारीख ठरली! ‘हिंदुत्वाशी गद्दारी करणाऱ्यांना क्षमा नाही’, सिनेमाच्या नव्या पोस्टरने वेधलं लक्ष

अनघा अतुलने तिच्या इन्स्टाग्रामवर ‘कौन बनेगा करोडपती’च्या सीझनचा प्रोमो शेअर केला आहे. “माझं नवीन काम, पहिलं काम नेहमीच खास असतं… अमिताभ बच्चन सरांबरोबर पहिल्यांदाच काम करण्याची संधी मिळणं ही माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. केबीसी जाहिरात” असं कॅप्शन अभिनेत्रीने हा प्रोमो शेअर करत लिहिलं आहे.

हेही वाचा : ‘कोंबडी पळाली’च्या चित्रीकरणादरम्यान झालेला घोळ, प्रसिद्ध अभिनेत्याने केलं होतं सहाय्यक दिग्दर्शकाचं काम; वाचा ‘जत्रा’विषयी न माहिती असलेल्या गोष्टी

अनघाच्या पोस्टवर नेटकऱ्यांसह मराठी कलाकारांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे. रेश्मा शिंदे, तितीक्षा तावडे, ऋतुजा बागवे, पूजा बिरारी, शिवानी सोनार या अनघाच्या जवळच्या मैत्रिणींनी या प्रोमोवर कमेंट्स करत तिला शुभेच्छा दिल्या आहेत. ‘कौन बनेगा करोडपती’चा हा नवीन सीझन प्रेक्षकांच्या भेटीला केव्हा येणार हे अद्याप गुलदस्त्यात ठेवण्यात आलं आहे.

हेही वाचा : नव्या घराच्या नेमप्लेटवर का नाही रुपाली भोसलेचं नाव? अभिनेत्री स्वतः खुलासा करत म्हणाली, “माझं कायम…”

दरम्यान, अनघाच्या कामाबद्दल सांगायचं झालं, तर तिने ‘रंग माझा वेगळा’, ‘पिरतीचा वणवा उरी पेटला’ यांसारख्या मालिकांमध्ये खलनायिकेच्या भूमिका साकारल्या आहेत. याशिवाय वैयक्तिक आयुष्यात अभिनेत्री बिझनेस वुमन देखील आहे. आपल्या भावाच्या साथीने गेल्यावर्षी तिने पुण्यात नवीन हॉटेल सुरु केलं आहे.

Story img Loader