‘झी मराठी’ वाहिनीवरील ‘वेध भविष्याचा’ कार्यक्रमातून घराघरात पोहोचलेले पंडित अतुलशास्त्री भगरे गुरुजी यांचा मुलगा अखिलेश भगरे लवकरच बोहल्यावर चढणार आहे. याबाबत भगरे गुरुजींची लेक अभिनेत्री अनघा अतुलने सोशल मीडियाद्वारे पोस्ट शेअर केली आहे. फेब्रुवारी महिन्यात अखिलेश भगरेच्या लग्नाची सुपारी फुटली. त्यानंतर मे महिन्यापासून लग्नाआधीच्या विधींना सुरुवात झाली. आता लवकरच भगरे गुरुजींचा मुलगा लग्नबंधनात अडकणार असून लग्नघराचा व्हिडीओ नुकताच अनघाने सोशल मीडियावर शेअर केला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अखिलेश भगरे वैष्णवी जाधवशी लग्नगाठ बांधून आयुष्याच्या नव्या प्रवासाला सुरुवात करणार आहे. मे महिन्यात अखिलेशच्या लग्नाचा मुहूर्त ठरला. हा मुहूर्त समारंभ घराच्या घरी पारंपरिक पद्धतीने पार पडला होता. यावेळी हळद कुटण्याचा कार्यक्रम वगैरे झाला होता. त्यानंतर आता सहा महिन्यांनी अखेर अखिलेश वैष्णवीशी लग्नबंधनात अडकणार आहे.

हेही वाचा – ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ फेम अभिनेत्री लवकरच अडकणार लग्नबंधनात; ‘या’ दिवशी वाजणार सनई-चौघडे

अनघाने भावाच्या लग्नाची तयारी पूर्णपणे केली आहे. लग्नाच्या तयारीचे फोटो अनघाने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. ज्यामध्ये काही बॅगा दिसत आहेत. हा फोटो शेअर करत अनघाने लिहिलं आहे, “अखिलेश आणि वैष्णवीच्या लग्नाला चला….रॉक अँड रोल करण्यासाठी सज्ज.”

अनघा अतुलची इन्स्टाग्राम स्टोरी

हेही वाचा – अमिताभ बच्चन होते बॅकबेंचर, शाळेच्या आठवणी सांगत म्हणाले, “मागे बसून मी आणि माझे मित्र…”

या फोटोनंतर अनघाने एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यामध्ये लग्नघर पाहायला मिळत आहे. या व्हिडीओमध्ये सुंदर फुलांनी सजवलेलं घर दिसत आहे.

https://www.loksatta.com/wp-content/uploads/2024/11/Angha-atul.mp4

दरम्यान, गेल्या वर्षी अनघा आणि अखिलेशने पुण्यात स्वतःचं हॉटेल सुरू केलं. ‘वदनी कवळ’ असं या हॉटेलचं नाव असून भावा-बहिणीने सुरू केलेल्या या हॉटेलला खवय्यांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. मराठीतील बरेच कलाकार अनेकदा ‘वदनी कवळ’ हॉटेलमध्ये जेवणाचा आस्वाद घेतना दिसत असतात.

हेही वाचा – ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ फेम स्वप्नील राजशेखर खरं आडनाव का लावत नाहीत? ‘राजशेखर’ नावामागे आहे रंजक गोष्ट, वाचा…

अनघा अतुलच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, गेल्यावर्षी सप्टेंबर महिन्यात तिची लोकप्रिय मालिका ‘रंग माझा वेगळा’ने प्रेक्षकांचा निरोप घेतला. या मालिकेत अनघाने साकारलेली श्वेता प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस पडली होती. त्यामुळे अनघाला पुन्हा एकदा नव्या भूमिकेत पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक होते. त्यानंतर ती ‘कलर्स मराठी’वरील ‘पिरतीचा वनवा उरी पेटला’ या लोकप्रिय मालिकेत पाहायला मिळाली. तिने या मालिकेत मनालीची भूमिका साकारली आहे.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bhagare guruji son akhilesh bhagare will get marriage anagha atul share video pps