झी मराठी वाहिनीवरील ‘भागो मोहन प्यारे’ या मालिकेमुळे प्रसिद्धीझोतात आलेली अभिनेत्री म्हणजे सरिता मेहेंदळे. या मालिकेत तिने भूताची भूमिका साकारली होती. तिची ही भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली होती. आता सरिताने तिच्या चाहत्यांना एक मोठी गुडन्यूज दिली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अभिनेत्री सरिता मेहेंदळे लवकरच आई होणार आहे. तिने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करत याबद्दलची गुडन्यूज दिली आहे. यावेळी तिने तिच्या डोहाळे जेवणाचा एक फोटो पोस्ट केला आहे. यात ती आणि तिचे पती सौरभ जोशी आनंदात पाहायला मिळत आहे.
आणखी वाचा : ‘झिम्मा २’ चित्रपटात शिवानी सुर्वे आणि सुचित्रा बांदेकर यांच्यात असणार खास कनेक्शन, पोस्ट चर्चेत

या फोटोला तिने हटके कॅप्शन दिले आहे. “आमच्या संपूर्ण प्रवासात लवकरच एक छोटा पाहुणा येणार आहे”, असे सरिता मेहेंदळने म्हटले आहे. त्याबरोबरच तिने कुणीतरी येणार येणार गं, नवीन पाहुणा, कपल गोल्स असे काही हॅशटॅगही दिले आहेत.

तिच्या या गुडन्यूजनंतर कलाविश्वातील अनेक मंडळी तिचे अभिनंदन करताना दिसत आहेत. या पोस्टवर अभिनेत्री गौतमी देशपांडे, राज हंचनाळे यांसारखे अनेक कलाकार कमेंट करत तिचे अभिनंद करताना पाहायला मिळत आहेत.

आणखी वाचा : “ती जखम रोज थोडी थोडी…”, कुशल बद्रिकेची ‘ती’ पोस्ट चर्चेत

दरम्यान सरिता अनेक मालिका आणि नाटकात झळकली. ‘कन्यादान’, ‘सरस्वती’ यांसारख्या मालिकेत तिने काम केले आहे. तसेच अमोल कोल्हे यांच्यासोबत ‘अर्धसत्य’ या नाटकात तिनं काम केलं होतं. ‘भागो मोहन प्यारे’ या मालिकेमुळे तिला खरी प्रसिद्धी मिळाली. यात तिने मोहनच्या मागे असलेली हडळ मधुवंतीचे पात्र साकारले होते.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bhago mohan pyare serial fame actress sarita mehendale share pregency good news instagram post nrp