प्रेक्षकांच्या आवडीचा विषय म्हणजे छोट्या पडद्यावरील मालिका असतात. मालिकांमधील नवनवीन ट्विस्ट आणि नव्या कलाकारांची एन्ट्री ही नेहमीच प्रेक्षकांना खिळवून ठेवतं असते. अशी एक मालिका म्हणजे ‘कलर्स मराठी’ वाहिनीवरील ‘भाग्य दिले तू मला’. ही मालिका प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवतं आहे. या मालिकेतील प्रत्येक कलाकारानं त्यांच्या अभिनयानं प्रेक्षकांच्या मनात घर निर्माण केलं आहे. अशात आता या मालिकेतील एक कलाकार नव्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा – “जर दिग्दर्शक व्हायचं असेल तर….” अभिनेता चिन्मय मांडलेकरनं दिला मोलाचा सल्ला, म्हणाला…

‘भाग्य दिले तू मला’ ही लोकप्रिय मालिकांपैकी एक आहे. या मालिकेतील सकारात्मक भूमिका असो किंवा नकारात्मक भूमिका प्रत्येक भूमिकेनं प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. आता या मालिकेत नकारात्मक भूमिका साकारलेली अभिनेत्री जान्हवी किल्लेकर ‘झी मराठी’वरील लोकप्रिय मालिकेत झळकणार आहे.

हेही वाचा – “आपण एकत्र मिळून बदलू शकतो”, शिव ठाकरेनं जुहू बीचवर केली साफसफाई, व्हिडीओ आला समोर

अभिनेत्री जान्हवीनं ‘भाग्य दिले तू मला’मध्ये सानिया साकारली असून तिची ही भूमिका चांगलीच गाजली आहे. जरी नकारात्मक भूमिका असली तरी प्रेक्षक तिच्यावर भरभरून प्रेम करत आहेत. अशातच आता सानिया म्हणजेच जान्हवी नव्या भूमिकेत प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ या मालिकेत ती महत्त्वाच्या भूमिकेत झळकणार आहे. अद्याप भूमिकेचं नाव अस्पष्ट आहे.

हेही वाचा – “मारझोड करून इस्लाम स्वीकारण्यास…” राखी सावंतचा पतीबद्दल मोठा खुलासा, म्हणाली, “दोन वेळा घटस्फोट…”

दरम्यान, जान्हवीनं ‘भाग्य दिले तू मला’ व्यतिरिक्त ‘आई माझी काळुबाई’, ‘स्वामी समर्थ’ या मालिकांमध्ये काम केलं आहे. तसेच ती काही मराठी चित्रपटातही झळकली आहे.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bhagya dile tu mala fame actress jahnavi killekar will entry in satvya mulichi satvi mulgi marathi serial pps