सध्या महाराष्ट्राची लाडकी वाहिनी असलेल्या ‘स्टार प्रवाह’वर नवनवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीस येत आहेत. अभिनेत्री मृणाल दुसानिस, ज्ञानदा रामतीर्थकर, विवेक सांगळे, विजय अंदाळकर यांच्या नव्या मालिकेची काही दिवसांपूर्वीच घोषणा झाली. ‘लग्नानंतर होईलच प्रेम’, असं यांच्या नव्या मालिकेचं नाव आहे. त्यानंतर काल, १६ नोव्हेंबरला आणखी एका नव्या मालिकेची घोषणा करण्यात आली आहे. याचा जबरदस्त प्रोमो सध्या चर्चेत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘स्टार प्रवाह’च्या या दुसऱ्या नव्या मालिकेचं नाव ‘तू ही रे माझा मितवा’ असं आहे. या नव्या मालिकेत ‘कुन्या राजाची गं तू राणी’ मालिकेतील अभिनेत्री शर्वरी जोग झळकणार आहे. तिच्याबरोबर अभिनेता अभिजीत आमकर पाहायला मिळणार आहे. शर्वरी आणि अभिजीतची ‘तू ही रे माझा मितवा’ मालिका २३ डिसेंबरपासून सोमवार-शनिवार रात्री १०.३० वाजता प्रसारित होणार आहे. याच नव्या मालिकेत ‘भाग्य दिले तू मला’ फेम अभिनेत्रीची वर्णी लागली आहे. याबाबत तिने नुकतीच सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे.

हेही वाचा – अभिनेत्री विशाखा सुभेदारने लेकाच्या वाढदिवसानिमित्ताने लिहिली खास पोस्ट, म्हणाली, “जे शिकायला परदेशी गेलायस…”

‘भाग्य दिले तू मला’ आणि ‘अबीर गुलाल’ मालिकेत झळकलेली अभिनेत्री सुरभी भावे आता ‘स्टार प्रवाह’च्या नव्या मालिकेत दिसणार आहे. तिने ‘तू ही रे माझा मितवा’ मालिकेचा प्रोमो शेअर करत लिहिलं आहे, “कलाकार म्हणून कायमच छान भूमिका करायला मिळणं हे प्रत्येकाचं स्वप्न असतं. दरवेळी ते पूर्ण होतंच असं नाही…कारण भूमिका किती जीव ओतून केली तरी त्याला उत्तम चॅनेल, उत्तम टीम, उत्तम प्रेक्षकांची साथ मिळणं पण तितकंच महत्वाचं असतं…आता हे सगळं गणित जमून आलं आहे आमच्या नवीन ‘तू ही रे माझा मितवा’ या मालिकेमुळे… महाराष्ट्राच्या लाडक्या वाहिनीवर ‘स्टार प्रवाह’वर लवकरच आपली भेट होणार आहे…आजवर जसं प्रेम केलं तसंच किंवा त्यापेक्षा जास्त प्रेम माझ्या या भूमिकेवर सुद्धा कराल अशी खात्री आहे. २३ डिसेंबरपासून रात्री १०.३० वाजता फक्त आपल्या ‘स्टार प्रवाह’वर ‘तू ही रे माझा मितवा’…शर्वरी आणि अभिजीत लेट्स रॉक.”

हेही वाचा – हिंदी मालिकेच्या सेटवर निशिगंधा वाड यांचा अपघात; तातडीने रुग्णालयात केलं दाखल

हेही वाचा – Miss Universe 2024 : डेनमार्कची विक्टोरिया झाली ‘मिस युनिव्हर्स’, तर भारताची १८ वर्षांची सौंदर्यवती रिया सिंघा…

अभिनेत्री सुरभी भावेच्या या पोस्टवर इतर कलाकार मंडळीसह चाहत्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. तिला नव्या भूमिकेसाठी सर्वजण शुभेच्छा देताना दिसत आहेत. सुरभीच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, तिनं बऱ्याच मालिका आणि चित्रपटांमध्ये विविधांगी भूमिका साकारल्या आहेत. सध्या ती ‘राणी मी होणार’ या मालिकेत पाहायला मिळत आहे. याआधी सुरभी महेश मांजरेकरांच्या ‘ही अनोखी गाठ’ चित्रपटात झळकली होती.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bhagya dile tu mala fame actress surabhi bhave will appear in the new series tu hi re maza mitwa of star pravah pps