‘भाग्य दिले तू मला’ ही ‘कलर्स मराठी’वरील मालिका सध्या चांगलीच चर्चेत आहे. मालिकेत अभिनेता विवेक सांगळे आणि अभिनेत्री तन्वी मुंडले राज-कावेरीची प्रमुख भूमिका साकारत आहेत. राज-कावेरीच्या जोडीने प्रेक्षकांची विशेष पसंती मिळवली आहे. मात्र, लवकरच या मालिकेत एक नवा ट्विस्ट येणार आहे. या आगामी कथानकाचा एक प्रोमो मालिकेतील कलाकारांनी सोशल मीडियावर शेअर केला आहे. हा प्रोमो पाहून प्रेक्षकवर्ग काहीसा नाराज झाला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा : दया बेनने का सोडली मालिका? ‘तारक मेहता…’मधील बावरीचा मोठा खुलासा; म्हणाली…

‘भाग्य दिले तू मला’ या मालिकेने राज-कावेरीच्या लग्नानंतर वेगळे वळण घेतले होते. राजवर्धन आणि त्याच्या आईची सगळी प्रॉपर्टी वैदेही आणि सानियाने हस्तगत केल्यामुळे मोहिते कुटुंबीय ‘माहेरचा चहा’ या कंपनीची नव्याने सुरुवात करतात, असे दाखवण्यात आले होते. या सगळ्या संकटांनंतर राजची आई रत्नमाला मोहिते एक नवी सुरुवात म्हणून राज-कावेरीला हनिमूनला पाठवण्याचा निर्णय घेतात. मात्र, दुसरीकडे सानियाने राज- कावेरीच्या घातपाताचा कट रचला आहे.

हेही वाचा : “घटस्फोट कधी घेतलास?” कार्तिक-कियाराचा ‘तो’ फोटो पाहून नेटकरी गोंधळले; अभिनेत्रीने डिलीट केली इन्स्टाग्राम पोस्ट

मालिकेत येणाऱ्या या नव्या ट्विस्टचा प्रोमो सोशल मीडियावर रिलीज करण्यात आला असून हा प्रोमो राज-कावेरीची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री तन्वी मुंडले आणि अभिनेता विवेक सांगळेने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. यामध्ये राज-कावेरी हनिमूनला गेले असताना एक व्यक्ती कावेरीला धक्का मारून दरीत ढकलते असे दाखवण्यात आले आहे. प्रोमो पाहून प्रेक्षक काहीसे नाराज झाले आहेत.

हेही वाचा : ‘बिग बॉस ओटीटी २’चा प्रोमो झाला प्रदर्शित; यंदा प्रेक्षक असणार स्पर्धकांचे ‘बॉस’, केव्हा आणि कुठे पाहता येणार? जाणून घ्या

नवा प्रोमो पाहून प्रेक्षकांनी नाराजी व्यक्त करीत अनेक कमेंट्स केल्या आहेत. एका युजरने “राज-कावेरीचे लग्न झाल्यापासून एकही प्रोमो चांगला दाखवला नाही,” अशी प्रतिक्रिया दिली असून दुसऱ्या एका युजरने “असे दाखवायला नको होते; जर दाखवायचेच असेल तर कावेरीला परत जिवंत दाखवा नाही तर मालिका बघायला इंटरेस्ट नाही राहणार,” अशी कमेंट करीत नाराजी व्यक्त केली आहे.

दरम्यान, या नव्या प्रोमोमुळे ‘भाग्य दिले तू मला’ मालिकेचे पुढील कथानक काय असेल? मालिका कोणते रंजक वळण येणार याकडे प्रेक्षकांचे लक्ष लागून राहिले आहे.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bhagya dile tu mala marathi serial new promo release sva 00