टीव्ही मालिकांच्या शूटिंगमधून कलाकारांना वेळ मिळत नाही. किमान १२-१५ तास शूटिंग करावं लागतं. अनेक महिने सुट्ट्या घेता येत नाही. मात्र, फिरायला जाण्यासाठी कलाकार वेळ काढतात. टीव्हीवरील लोकप्रिय मालिकांपैकी एक ‘भाग्य लक्ष्मी’मध्ये लक्ष्मी हे पात्र साकारणारी ऐश्वर्या खरे सध्या तिच्या व्हेकेशनमुळे चर्चेत आहे. जवळपास वर्षभर शूटिंग केल्यानंतर तिने एक ब्रेक घ्यायचं ठरवलं. ब्रेकमध्ये ती परदेशवारी करून आली आहे. ती एकटीच तिच्या आवडत्या देशात फिरून आली आहे.

शूटिंग शेड्यूलमधून वेळ काढून वर्षाच्या शेवटी ऐश्वर्या खरे तिच्या आवडत्या देशात म्हणजेच थायलंडला फिरायला गेली होती. समुद्रकिनारी शांततेत ऐश्वर्याने नवीन वर्षाचे स्वागत केले. मागील दोन वर्षात तिने बाली आणि सेशेल्ससारख्या ठिकाणी भेट दिली आहे. यावेळी ती थायलंडला सोलो ट्रिपसाठी गेली होती.

aishwarya rai says chala chala in marathi video viral
Video: पती अभिषेक बच्चन अन् लेकीबरोबर मुंबईत परतली ऐश्वर्या राय; मराठीत म्हणाली असं काही की…, पाहा व्हिडीओ
ladki bahin yojana money recovery
अपात्र ‘लाडक्या बहिणी’ची रक्कम पुन्हा सरकारजमा
Marathi Actress Rucha Vaidya Engagement
अडीच महिन्यांपूर्वी आदिनाथ कोठारेच्या चित्रपटातून सिनेविश्वात पदार्पण करणाऱ्या मराठी अभिनेत्रीने उरकला साखरपुडा, फोटो आले समोर
Emotional video of a kid selling coconuts from boat hardworking child video viral on social media
जबाबदारी बालपणही हिरावून घेते! लहान मुलाच्या संघर्षाचा ‘हा’ VIDEO पाहून प्रत्येकाच्या डोळ्यात येईल पाणी
sweet reaction to first dish made by daughter in viral video is pure joy
लेकीचं कौतुक फक्त बापालाच! पहिल्यांदा मुलीने बनवला स्वयंपाक; वडीलांच्या प्रतिक्रियाने जिंकले नेटकऱ्यांचे मन, पाहा Viral Video
Kaumudi Walokar
Video : मराठी अभिनेत्री कौमुदी वलोकरने शेअर केला लग्नातील अनसीन व्हिडीओ; म्हणाली….
actor gurmeet choudhary diet plan
दीड वर्षापासून भात, पोळी, साखर काहीच खाल्लं नाही; बॉलीवूड अभिनेत्याचा खुलासा, म्हणाला…
Image of Goa beach, tourist shack
Tourists Beaten In Goa : मुंबईच्या पर्यटकांना गोव्यात मारहाण, पाच शॅक कर्मचाऱ्यांना अटक

हेही वाचा – वीकेंडला पाहता येतील गुगलवर सर्वाधिक सर्च झालेले ‘हे’ १० चित्रपट, ओटीटीवर आहेत उपलब्ध

थायलंड ट्रिपबद्दल ऐश्वर्या म्हणाली, “नवीन वर्ष साजरे करण्यासाठी मी अखेर ब्रेक घेतला. वर्षभरात जे काही चांगलं आणि वाईट घडलं, त्याचा विचार केला. मला समुद्रकिनारे खूप आवडतात. त्यामुळे मी फिरायला एकटं जाण्यासाठी थायलंड हे ठिकाण निवडलं. थायलंड खूप छान होते. थायलंडच्या निर्मळ सौंदर्याने मला शांतता मिळाली. दररोज संध्याकाळी मी समुद्रकिनारी बसून सूर्यास्त पाहायचे. माझी सर्वात आवडती ट्रिप होती.”

पाहा पोस्ट –

ऐश्वर्याने तिच्या थायलंड ट्रिपमध्ये काय काय केलं ते सांगितलं. समुद्रात स्नॉर्कलिंग केली. तिथल्या विविध पदार्थांचा आस्वाद घेतला. निसर्ग सौंदर्य पाहिले आणि तिथे राहण्याचा अनुभव घेतला, असं ऐश्वर्या म्हणाली.

हेही वाचा – “खोटं बोलून, माझं नाव वापरून…”, अंकिता प्रभू वालावलकर भडकली; म्हणाली, “आमच्या लग्नासाठी…”

ऐश्वर्याने मोठ्या उत्साहात नवीन वर्षाची सुरुवात केली आहे. ऐश्वर्याने तिच्या थायलंड ट्रिपमधील अनेक सुंदर फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. मालिकेत नेहमी साडीत दिसणाऱ्या ऐश्वर्याचे मोनोकिनीतील फोटो पाहून चाहते लाइक्स व कमेंट्सचा वर्षाव करत आहेत. काही चाहत्यांनी ऐश्वर्याला नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत, तर अनेकांनी तिच्या फोटोंवर रेड हार्ट इमोजी कमेंट्स केल्या आहेत.

हेही वाचा – ९ वर्षे रखडला, ८ कलाकारांनी नाकारला अन् नंतर ब्लॉकबस्टर ठरला; तुम्ही पाहिलाय का ‘हा’ चित्रपट?

ऐश्वर्याने ‘ये शादी है या सौदा’ या मालिकेतून टीव्हीवर पदार्पण केले होते. नंतर ती ‘विषकन्या’ या मालिकेत झळकली होती. सध्या ती ‘भाग्य लक्ष्मी’मध्ये लक्ष्मीच्या भूमिकेत दिसत आहे.

Story img Loader