मराठी मालिकाविश्वात अनेक मालिका ( Marathi Serial ) सुपरहिट ठरल्या. या मालिकेच्या कथेपासून ते कलाकारांच्या भूमिकेपर्यंत प्रत्येक गोष्ट रसिक प्रेक्षकांच्या घराघरात पोहोचली. एवढंच नाहीतर बऱ्याच लोकप्रिय मालिकांच्या शीर्षकगीताने प्रेक्षकांना वेड लावलं. अजूनही अनेक जुन्या लोकप्रिय मालिकांचे शीर्षकगीत मराठी रसिक प्रेक्षकांच्या ओढांवर आहेत. अशीच एक १० वर्षांपूर्वी एक मराठी मालिका सुपरहिट झाली होती. या मालिकेने चार वर्षांहून अधिक काळ प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं होतं. याच मालिकेचे जुने फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. या मालिकेत झळकलेल्या अभिनेत्रीने काही फोटो शेअर करून जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

या व्हायरल फोटोमध्ये अभिनेता विवेक सांगळे, अभिनेत्री किशोरी अंबिये, अभिनेता विनोद गायकर आणि अभिनेत्री भाग्यश्री मोटे दिसत आहेत. या चारही जणांना पाहून अनेकांनी ही लोकप्रिय मालिका ( Marathi Serial ) कोणती हे अचूक ओळखल देखील असेल. ‘स्टार प्रवाह’ वाहिनी २०१२ साली सुरू झालेली ही मालिका दुसरी तिसरी कोणती नसून ‘देवयानी’ ( Devayani Serial ) आहे. ‘देवयानी’ या मालिकेतील कलाकारांचा हा फोटो आहे. अभिनेत्री भाग्यश्री मोटेने ‘देवयानी’ मालिकेतील फोटो शेअर केले आहेत. याचं निमित्त देखील खास आहे.

Devayani Marathi Serial

हेही वाचा – मराठी अभिनेत्रीची सुधीर मुनगंटीवार यांच्यासाठी खास पोस्ट, म्हणाली, “वाळवंटातही नंदनवन खुलवू शकतात…”

अभिनेत्री भाग्यश्री मोटे पोस्ट वाचा

१० वर्षांपूर्वी भाग्यश्री मोटेचा ‘देवयानी’ मालिकेतील पहिला भाग प्रसारित झाला होता. यानिमित्ताने तिनं मालिकेतील जुने फोटो शेअर करत खास पोस्ट लिहिली आहे. “बरोबर, १० वर्षांपूर्वी ही मालिका सुरू झाली आणि तेव्हापासून माझं आयुष्य पूर्वीसारखं राहिलंच नाही. मला माझी ओळख मिळाली. अजूनही लोक मला देवयानी व्यक्तिरेखेनेच ओळखतात. माझ्या आयुष्यातील ही व्यक्तिरेखा खूप महत्त्वाची आहे. या मालिकेमुळे मी जे काही शिकले त्याबद्दल मी नेहमीच खूप आनंदी आहे. ‘देवयानी’ मालिकेतील माझा पहिला भाग प्रसारित होऊन आज १० वर्षे पूर्ण होतं आहेत.”

हेही वाचा – अमिताभ बच्चन यांच्याकडून सोशल मीडियावर झाली चूक, ‘त्या’ पोस्टवरून मागितली माफी

दरम्यान, भाग्यश्री मोटेच्या या पोस्टवर ‘देवयानी’ मालिकेच्या ( Marathi Serial ) चाहत्यांनी भरभरून प्रतिक्रिया दिल्या आहेत. “देवयानी आमची कायम आवडती मालिका राहिल”, “देवयानी मालिकेपासून मी तुमचा चाहता आहे”, “माझी आवडती मालिका होती”, अशा अनेक प्रतिक्रिया चाहत्यांनी दिल्या आहेत.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bhagyashree mote share memories of devayani marathi serial pps