अभिनेत्री रेश्मा शिंदे(Reshma Shinde) २९ नोव्हेंबरला लग्नबंधनात अडकली आहे. केळवणापासून ते हळदीपर्यंत रेश्माचे सर्व कार्यक्रम एकदम दणक्यात पार पडल्याचे पाहायला मिळाले. या सर्व कार्यक्रमांना तिच्या कलाकार मित्र-मैत्रीणींनी हजेरी लावल्याचे समोर आलेल्या फोटोमधून दिसले. तिच्या लग्नालादेखील तिची गाजलेली मालिका ‘रंग माझा वेगळा’ मधील सहकलाकारांनी हजेरी लावली होती. याबरोबरच, ‘लगोरी’ मालिकेतील अनघा व अभिज्ञा या अभिनेत्रींनीदेखील हजेरी लावली होती. सध्या रेश्मा ज्या मालिकेत काम करत आहे ती मालिका म्हणजे ‘घरोघरी मातीच्या चुली’ या मालिकेतील कलाकारांनीदेखील तिच्या लग्नाला हजेरी लावल्याचे पाहायला मिळाले. रेश्माच्या लग्नाचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत. या सगळ्यात मात्र तिच्या वाढदिवसानिमित्त तिच्या सहकलाकार भक्ती देसाईने शेअर केलेला व्हिडीओ सध्या चाहत्यांचे लक्ष वेधून घेताना दिसत आहे.

काय म्हणाली अभिनेत्री?

अभिनेत्री भक्ती देसाईने सोशल मीडियावर रेश्माचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ शेअर करताना रेश्माला टॅग करत वाढदिवसाच्या शुभेच्छा देत, “सेटवरच्या लग्नात रेश्मा”, असे लिहित पुढे हसण्याच्या इमोजी शेअर केल्या आहेत. या व्हिडीओमध्ये रेश्मा आंतरपाटाच्या एका बाजूला उभी असलेली दिसत आहे. तिच्या हातात फुलांचा हार आहे. या व्हि़डीओमध्ये ती मजा मस्ती करताना दिसत आहे. हा व्हिडीओ घरोघरी मातीच्या चुली या मालिकेतील लग्नाच्या शूटिंगचा आहे.

lakhat ek amcha dada fame nitish chavan dance with Mahesh Jadhav and swapnil kinase
Video: प्रेमिका ने प्यार से…; ‘लाखात एक आमचा दादा’ मालिकेतील सूर्यादादाचा काजू, पुड्याबरोबर जबरदस्त डान्स, पाहा व्हिडीओ
Eknath Shinde
Eknath Shinde : तुम्ही गृहखातं, विधानसभा अध्यक्षपद मागितलं…
cm eknath shinde
…विकास हाच आमचा अजेंडा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे स्पष्ट प्रतिपादन
Swara bhaskar photo with Sajjad Nomani Troll
Swara Bhaskar: ‘व्होट जिहाद’चा उल्लेख केलेल्या सज्जाद नोमानींसह स्वरा भास्करचा फोटो पाहून नेटिझन्सनी उडवली खिल्ली
aayushman khurana
आयुष्मान खुरानाचा ताहिराबरोबर झाला होता ब्रेकअप; ‘हे’ होते कारण, अभिनेत्याने स्वत:चं केला खुलासा
Lakhat Ek Aamcha dada
Video: तेजूच्या लग्नाची सुपारी फुटली; डॅडी म्हणाले, “खरे नवरदेव…”, पाहा प्रोमो
Eknath Shinde on Raj Thackeray
Eknath Shinde: राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यात काय बिनसलं? शिंदे यांनी स्पष्टच सांगितलं; म्हणाले…

याबरोबरच, भक्ती देसाईने तिच्या इन्स्टाग्रामवर रेश्मा शिंदेच्या लग्नाचे फोटोदेखील शेअर केले आहेत. घरोघरी मातीच्या चुली मालिकेतील कलाकारांचे हे फोटो चाहत्यांच्या पसंतीस उतरत असल्याचे पाहायला मिळत आहेत.

हेही वाचा: ५० हजार रुपये देऊन खलनायकाची भूमिका करण्यापासून रोखलं; शक्ती कपूर यांनी असं का केलं? बॉलीवूडच्या ‘या’ अभिनेत्याने केला खुलासा

दरम्यान, स्टार प्रवाह वाहिनीवर रेश्मा शिंदे सध्या ‘घरोघरी मातीच्या चुली’ या मालिकेत प्रमुख भूमिकेत दिसत आहे. या मालिकेत तिने जानकी हे पात्र साकारले आहे. साधी, संस्कारी, कुटुंबाला सर्वोच्च स्थान देणारी, कोणत्याही परिस्थितीला धाडसाने सामोरी जाणारी अशी तिची भूमिका या मालिकेत पाहायला मिळत आहे. ऐश्वर्या ही तिची जाऊ तिला त्रास देण्यासाठी सतत काही ना काही करत असल्याचे पाहायला मिळते. तिच्यामुळे जानकीला तिच्या पती व मुलीसह घराबाहेर पडावे लागले आहे. आता ऐश्वर्याचे सत्य सर्वांसमोर कसे व कधी येणार आणि जानकीची खरी बाजू सर्वांना कधी समजणार हे पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.