अभिनेत्री रेश्मा शिंदे(Reshma Shinde) २९ नोव्हेंबरला लग्नबंधनात अडकली आहे. केळवणापासून ते हळदीपर्यंत रेश्माचे सर्व कार्यक्रम एकदम दणक्यात पार पडल्याचे पाहायला मिळाले. या सर्व कार्यक्रमांना तिच्या कलाकार मित्र-मैत्रीणींनी हजेरी लावल्याचे समोर आलेल्या फोटोमधून दिसले. तिच्या लग्नालादेखील तिची गाजलेली मालिका ‘रंग माझा वेगळा’ मधील सहकलाकारांनी हजेरी लावली होती. याबरोबरच, ‘लगोरी’ मालिकेतील अनघा व अभिज्ञा या अभिनेत्रींनीदेखील हजेरी लावली होती. सध्या रेश्मा ज्या मालिकेत काम करत आहे ती मालिका म्हणजे ‘घरोघरी मातीच्या चुली’ या मालिकेतील कलाकारांनीदेखील तिच्या लग्नाला हजेरी लावल्याचे पाहायला मिळाले. रेश्माच्या लग्नाचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत. या सगळ्यात मात्र तिच्या वाढदिवसानिमित्त तिच्या सहकलाकार भक्ती देसाईने शेअर केलेला व्हिडीओ सध्या चाहत्यांचे लक्ष वेधून घेताना दिसत आहे.
Video : रेश्मा शिंदेला दिल्या वाढदिवसाच्या हटके शुभेच्छा! ‘या’ अभिनेत्रीने शेअर केला ऑनस्क्रीन लग्नाचा मजेशीर व्हिडीओ
Reshma Shinde: 'घरोघरी मातीच्या चुली' मालिकेच्या शूटिंगदरम्यानचा रेश्मा शिंदेचा व्हिडीओ पाहिलात का?
Written by एंटरटेनमेंट न्यूज डेस्क
Updated:
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 02-12-2024 at 19:07 IST
© IE Online Media Services (P) Ltd
© IE Online Media Services (P) Ltd
TOPICSटेलिव्हिजनTelevisionमनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment Newsमराठी मालिकाMarathi Serials
मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bhakti desai shares video of marriage shooting gharoghari matichya chuli behind the scene reshma shinde marathi actress nsp