‘कलर्स मराठी’ वाहिनीवर काही दिवसांपूर्वीच ‘हसताय ना? हसायलाच पाहिजे’ हा नवीन कॉमेडी कार्यक्रम सुरू झाला. या कार्यक्रमाद्वारे सध्या डॉ. निलेश साबळे, ओंकार भोजने, भाऊ कदम हे तीन विनोदवीर महाराष्ट्राला खळखळून हसवत आहेत. याशिवाय अभिनेते भरत जाधव व ज्येष्ठ अभिनेत्री अलका कुबल यांनी या कार्यक्रमात सूत्रसंचालनाची जबाबदारी सांभाळली आहे.

‘हसताय ना? हसायलाच पाहिजे’ या कार्यक्रमात यंदाच्या आठवड्यात ‘नाच गं घुमा’ टीमने खास उपस्थिती लावली होती. अभिनेता- निर्माता स्वप्नील जोशी, लेखिका मधुगंधा कुलकर्णी, सुकन्या कुलकर्णी, सुप्रिया पाठारे, सारंग साठ्ये, शर्मिष्ठा राऊत आणि बालकलाकार मायरा वायकुळ यावेळी उपस्थित होते. या सगळ्यांनी एकत्र मिळून धमाल केल्याचं या भागात पाहायला मिळालं.

हेही वाचा : “सर्वात चांगली आई…”, मातृदिनानिमित्त रितेश देशमुखने शेअर केला खास व्हिडीओ; जिनिलीया कमेंट करत म्हणाली…

‘नाच गं घुमा’ चित्रपट सध्या महाराष्ट्रात धुमाकूळ घालत असल्याचं पाहायला मिळत आहे. सर्वत्र केवळ याच चित्रपटाची चर्चा चालू आहे. त्यामुळे या चित्रपटाबद्दल प्रत्येकाच्या मनात उत्सुकता निर्माण झाली आहे. अशातच ‘नाच गं घुमा’चं शीर्षक गीत गेली दोन महिने इन्स्टाग्राम रील्सवर ट्रेडिंग होत आहे. त्यामुळे ‘हसताय ना? हसायलाच पाहिजे’ कार्यक्रमाच्या मंचावर आल्यावर सुद्धा या कलाकारांना व निर्मात्यांना ‘नाच गं घुमा’ गाण्यावर नाचण्याचा मोह आवरला आहे.

हेही वाचा : Video : “चाळीतून थेट २ बीएचके…”, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम शिवाली परबचा नव्या घरात गृहप्रवेश! नेमप्लेटने वेधलं लक्ष

सारंग साठ्ये, सुप्रिया पाठारे, भरत जाधव, अलका कुबल, बालकलाकार मायरा वायकुळ, डॉ. निलेश साबळे, स्वप्नील जोशी, सुकन्या मोने, मधुगंधा कुलकर्णी, शर्मिष्ठा राऊत हे सगळ्यांनी एकत्र रांगेत ‘नाच गं घुमा’च्या शीर्षक गीतावर जबरदस्त डान्स केला. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

हेही वाचा : Video : “पप्पा आपली गाडी…”, लोकप्रिय अभिनेत्रीने घेतली नवीन गाडी; लेकीचं सरप्राईज पाहून आई-बाबा भावुक

दरम्यान, ‘नाच गं घुमा’ चित्रपटाबद्दल सांगायचं झालं, तर यामध्ये मुक्ता बर्वे आणि नम्रता संभेराव यांच्या प्रमुख भूमिका आहेत. दोघींच्या अफलातून केमिस्ट्रीची चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यावरच चर्चा रंगली होती. याशिवाय चित्रपटाचं कथानक प्रत्येक महिलेला जवळच वाटत आहे. या चित्रपटाने १० दिवसांत बॉक्स ऑफिसवर ११ कोटींहून अधिक कमाई केली आहे.

Story img Loader