टीव्ही क्षेत्रातील सर्वात पहिली महिला कॉमेडियन म्हणून भारती सिंग ओळखली जाते. ती अतिशय लोकप्रिय आहे. तिने २०१७ मध्ये हर्ष लिंबाचियासोबत लग्नगाठ बांधली. त्यानंतर तब्बल पाच वर्षांनी एप्रिल महिन्यात भारती सिंहने बाळाला जन्म दिला. मुलाच्या जन्मानंतर अवघ्या १२ दिवसांमध्येच ती तिच्या कामावर परतली. अनेकदा ती तिच्या मुलालाही शूटिंग सेटवर घेऊन येते. तिच्या मुलाला लाडाने सगळेजण गोला असं म्हणतात. पण तिच्या मुलाचे नाव चुकीचे उच्चारणाऱ्यांवर भारती वैतागलेली दिसली.
आणखी वाचा : गणितज्ञ डॉ. वशिष्ठ नारायण सिंह यांच्या बायोपिकमधून हृतिक रोशनचा पत्ता कट, जाणून घ्या कारण
नुकताच भारती सिंगचा एक व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये ती तक्रार करताना दिसत आहे. ती म्हणते, “लोक माझ्या मुलाला सारखी गोला-गोला अशी हाक मारतात. पण त्याचे नाव लक्ष्य आहे. त्याला लक्ष्य या नावाने जर कोणी हाक मारली तर मला खूप आनंद होतो.”
पुढे भारतीने असेही सांगितले की तिला तिच्या मुलाबरोबर जास्तीत जास्त वेळ घालवायचा असल्याने तिने शोची संख्या कमी केली आहे आणि आता ती फक्त एकच शो करत आणि, जेणेकरून ती तिच्या मुलासोबत अधिकाधिक वेळ घालवू शकेल.
हेही वाचा : स्वत: च्या डिलिव्हरीबद्दल Fake News ऐकून भारती सिंगला वाटतेय भीती, म्हणाली…
भारतीचा मुलगा आता सहा महिन्यांचा आहे. भारतीने तिच्या प्रेग्नेसींच्या नवव्या महिन्यापर्यंत हुनरबाज कार्यक्रम होस्ट केला होता. त्यामुळे तिचे सर्वत्र कौतुक केले जात होते. त्यापूर्वी भारती ही ‘डान्स दीवाने’ शोच्या मंचावर पती हर्षसोबत धमाल करताना दिसली. भारतीने इंडियन लाफ्टर चॅलेंज या शो मधून करिअरला सुरुवात केली. या शोमध्ये भारतीने ‘लल्ली’ नावाचं एक कॅरेक्टर केलं होतं. या कॅरेक्टरने तिला एका रात्रीत स्टार केलं. या शोनंतरच भारतीच्या करिअरला दिशा मिळाली. आज ती सिनेसृष्टीत ‘लाफ्टर क्वीन’ म्हणून राज्य करत आहे.