कॉमेडियन भारती सिंहचा मुलगा लक्ष्य सध्याच्या लोकप्रिय स्टार किड्सपैकी एक आहे. तो जेवढा क्यूट दिसतो तेवढाच संस्कारीही आहे. भारतीने शेअर केलेल्या प्रत्येक व्हिडीओमध्ये याची झलक पाहायला मिळते. भारती सिंह अनेकदा युट्यूबवर लक्ष्यचे बरेच व्हिडीओ शेअर करत असते. ज्यात तो कधी भजनाच्या तालावर टाळ्या वाजवताना तर कधी हात जोडताना दिसतो. आता त्याचा असाच एक व्हिडीओ व्हायरल होताना दिसत आहे. ज्यात तो फोटोग्राफर्सना पाहून हात जोडून नमस्कार करताना दिसत आहे.
भारती सिंह नुकतीच मुंबई विमानतळावर स्पॉट झाली. त्यावेळी फोटोग्राफर्सनी तिला घेरलं. भारतीबरोबर तिचा मुलगा लक्ष्यही होता. त्यामुळे नेहमीप्रमाणे फोटोग्राफर्सनी त्याच्याबरोबर मस्ती करण्यास सुरुवात केली. भारती सिंहच्या कडेवर असलेला लक्ष्य सर्वांना गोड स्माइल देत होता. तेवढ्यात भारतीने त्याला, “मामाला जय श्री कृष्ण म्हण” असं सांगितलं. त्यानंतर लक्ष्यने केलेल्या त्या कृतीने सर्वांची मनं जिंकली.
आणखी वाचा- “अनेकांना वाटतं मी त्यांच्या संधी हिसकावते…” भारती सिंगचं विधान चर्चेत
लक्ष्यला भारतीने जय श्री कृष्ण म्हणायला सांगितल्यानंतर त्याने फोटोग्राफर्सना पाहून जय श्री कृष्णची कृती करत हात जोडले. त्यानंतर भारती त्याला घेऊन आपल्या कारमधून निघून गेली. पण भारतीच्या मुलाचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. नेटकरी भारतीच्या मुलाने केलेल्या कृतीवर भलतेच फिदा असून त्यांनी या व्हिडीओवर कमेंट्सचा अक्षरशः पाऊस पाडला आहे.
आणखी वाचा- “जितेंद्र यांच्याशी फ्लर्ट…” अभिनेत्री मुमताज यांनी अभिनेत्याबाबत केला मोठा खुलासा
सोशल मीडियावरील भारती सिंहच्या मुलाच्या व्हिडीओचं नेटकऱ्यांनी खूप कौतुक केलं आहे. एका युजरने कमेंट करताना लिहिलं, “भारतीजी तुम्ही मुलाला खूप चांगले संस्कार देत आहात.” दुसऱ्या युजरने लिहिलं, “भारती तू खूप उत्तम आई आहेस, मुलाला खूप चांगले संस्कार देत आहेस.” तर आणखी एकाने लिहिलं, “आमचा गोलू किती चांगला आणि संस्कारी बाळ आहे.” याशिवाय बऱ्याच युजर्सनी ‘जय श्री कृष्ण’ अशा कमेंट्स केल्या आहेत.