सोशल मीडिया सेन्सेशन उर्फी जावेद तिच्या चित्रविचित्र कपड्यांमुळे नेहमीच चर्चेत असते. अतरंगी कपड्यांमुळे उर्फी चाहत्यांचं लक्ष वेधून घेत असते. उर्फीचे अनेक फोटो व व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. उर्फी जावेदच्या कपड्यांवर भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनी आक्षेप घेतला होता.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

चित्रा वाघ यांनी उर्फीविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली होती. तिच्या कपड्यांवर आक्षेप घेत महाराष्ट्रात हे चालणार नाही, असं त्या म्हणाल्या होत्या. “उर्फीला थोबडवेन”, असं वक्तव्यही चित्रा वाघ यांनी केलं होतं. चित्रा वाघ यांच्या या वक्तव्यानंतर उर्फीनेही त्यांना उत्तर देत त्यांच्याविरोधात तक्रार दाखल केली होती. या प्रकरणावर आता ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

हेही वाचा>> दादरमधील गोळीबार प्रकरण: सदा सरवणकरांना क्लीनचिट मिळताच भास्कर जाधवांचं भाजपावर टीकास्र; म्हणाले, “हे सर्व…”

सदा सरवणकर यांना दादरमध्ये गणेशोत्सवादरम्यान झालेल्या गोळीबाराप्रकरणी पोलिसांकडून मिळालेल्या क्लीनचीटबाबत त्यांनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांनी चित्रा वाघ यांना खोचक टोला लगावला आहे. ते म्हणाले, ” यापूर्वी ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाले. ज्यांची ईडीने आणि सीबीआयने चौकशी केली, ते लोक भाजपात गेल्यानंतर त्यांना क्लीनचीट मिळत गेली. त्यामुळे सदा सरवणकरांना क्लीन चीट मिळाली, यात काही विशेष नाही. ते भाजपाच्या सरकारमधले एक घटक पक्ष आहे”.

हेही वाचा>> मलायका अरोरापासून दूर जाण्याची अरबाज खानला वाटायची भीती, अभिनेत्यानेच केलेला खुलासा

चित्रा वाघ यांना टोला लगावताना ते म्हणाले, “काय झालं उर्फी जावेदचं? ती पण भाजपात गेली काय? तिच्या कपड्यांबद्दल आता कोणीच काही बोलत नाहीये”.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bhaskar jadhav commented on bjp leader chitra wagh urfi javed controversy kak