भाऊ कदम हा मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेता आहे. त्याने आजवर अनेक चित्रपटांत काम करुन प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. विनोदी अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर छाप पाडणाऱ्या भाऊचा ५०वा वाढदिवस कुटुंबियांनी एकदम दणक्यात साजरा केला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

भाऊने ५०व्या वाढदिवस सेलिब्रेशनमधील एक व्हिडीओ त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर केला आहे. या खास क्षणी भाऊ कदमच्या मुलीने त्याच्याप्रती असलेल्या तिच्या भावना व्यक्त केल्या. मृणाल म्हणाली, “मी पप्पांना पत्र लिहिण्याचा प्रयत्न केला होता. परंतु, मी पेपरवर माझ्या भावना मांडू शकले नाही. मी आजपर्यंत अनेक स्पर्धांमध्ये निबंध लिहिले आहेत. प्रत्येकवेळी आईबद्दल विचारलं जायचं…पण कधीच बाबावर लिहिण्यासाठी सांगण्यात आलं नाही”.

हेही वाचा>> “नाटकाच्या प्रयोगादरम्यान एक मोठा उंदीर स्टेजवर आला अन्…” किरण मानेंनी सांगितला ‘तो’ किस्सा, म्हणाले…

“मी बाबांसारखी असल्याचा मला अभिमान आहे. मी कधी चुकले असेन तर सॉरी…आणि या सगळ्यासाठी थँक्यू…आज सगळे जण मला भाऊ कदम यांची मुलगी म्हणून ओळखतात. मी जी काही आहे…ते तुमच्यामुळे आहे,” असं म्हणताना मृणाल भावुक झालेली पाहायला मिळाली. वडिलांबद्दलच्या भावना व्यक्त करताना मृणालचे डोळे पाणावले होते.

हेही वाचा>> ‘काहे दिया परदेस’ फेम ऋषी सक्सेनाची हिंदी मालिकेत धमाकेदार एन्ट्री, व्हिडीओत दिसली झलक

भाऊ कदमने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन लेकीचा हा व्हिडीओ शेअर करत “निशब्द” असं कॅप्शन दिलं आहे. त्याच्या या व्हिडीओवर चाहत्यांनी कमेंटही केल्या आहेत. विनोदी अभिनयाने प्रेक्षकांना खळखळवून हसवणारा भाऊ कदम सध्या ‘चला हवा येऊ द्या’ शोमधून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bhau kadam celebrated his 50th birthday shared emotional video kak