प्रसिद्धी भोजपुरी अभिनेत्री आकांक्षा दुबेच्या आत्महत्येनंतर सर्वत्र खळबळ उडाली आहे. आकांक्षाने वाराणसीमधील सोमेंद्र हॉटेलमध्ये रविवारी(२६ मार्च) गळफास घेत जीवन संपवलं. ती २५ वर्षांची होती. तिच्या आत्महत्येचे वृत्त ऐकून तिचे सहकलाकार, कुटुंबीय आणि चाहते यांना धक्का बसला आहे. नुकतंच आकांक्षाची सहकलाकार आणि अभिनेत्री अक्षरा सिंहने एक पोस्ट शेअर केली आहे.

आकांक्षा दुबेच्या निधनाचे वृत्त ऐकून भोजपुरी अभिनेत्री अक्षरा सिंहला मोठा धक्का बसला आहे. अक्षराने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक पोस्ट शेअर केली आहे. त्यात तिने तिचा एक फोटो पोस्ट केला आहे. त्याबरोबर तिने आकांक्षाला श्रद्धांजली वाहिली आहे.
आणखी वाचा : Video : आकांक्षा दुबेने आत्महत्या करण्यापूर्वी केलेले इन्स्टाग्रामवर लाईव्ह, ढसाढसा रडून झालेली ‘अशी’ अवस्था

Manoj Jarange
Manoj Jarange : मनोज जरांगेंचा देवेंद्र फडणवीसांना सवाल, “खंडणीतला आरोपी तुमचं सरकार….”
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
Lakhat Ek Aamcha Dada
Video: “मुलगी म्हणजे संधी नाही, जबाबदारी असते…”, भाग्याला छेडणाऱ्याला सूर्या देणार शिक्षा; नेटकरी कौतुक करत म्हणाले, “आता झाला ना न्याय”
Young man murdered over dispute over money
हातउसने दिलेल्या पैशांच्या वादातून तरुणाचा खून, राजेंद्रनगर ‘एसआरए’ वसाहतीतील घटना
Neena Gupta aunt threw her out after daughter Masaba birth
लग्न न करता झालेली आई, एकदा काकूने अचानक मध्यरात्री…; बॉलीवूड अभिनेत्रीने सांगितला ‘तो’ प्रसंग, म्हणाली…
Sheeba says Sunil Dutt made her method actress
“त्यांनी मला एका कोपऱ्यात बसून रडायला सांगितलं, कोणालाच…”; प्रसिद्ध अभिनेत्रीने सांगितला सुनील दत्त यांच्याबरोबर काम करण्याची आठवण
when sanjay kapoor slapped madhuri dixit in raja movie
“संजय कपूरने माधुरी दीक्षितला झापड मारल्यावर…”, दिग्दर्शकाने सांगितली ‘ती’ आठवण; म्हणाला, “मला वाटलं माझं करिअर संपलं”
richa chadha and ali fazal What language speak with daughter
रिचा चड्ढा-अली फैजल चिमुकल्या लेकीशी ‘असा’ साधतात संवाद, तिच्यासाठी गातात ‘हे’ गाणं

“मी काय लिहू, काय बोलू, हे मला अजूनही समजत नाही. कालच तू मला मेसेज केला होता, दीदी वाराणसीत आहेस का?… मला अजूनही विश्वास बसत नाही की ही तीच धाडसी मुलगी आहे जिने तिच्या आई-वडिलांना आशा आणि चांगले आयुष्य देण्याचा विचार केला होता. मुलींनो, अजून वेळ आहे जागे व्हा आणि कोणतेही चुकीचे पाऊल उचलण्यापूर्वी एकदा आपल्या पालकांचा विचार करा.” असे कॅप्शन अक्षराने तिच्या या पोस्टला दिले आहे.

आणखी वाचा : Akanksha Dubey Suicide : १७ व्या वर्षी सिनेसृष्टीत पदार्पण, २५ व्या वर्षी आत्महत्या; कोण आहे आकांक्षा दुबे? 

दरम्यान प्रसिद्ध भोजपुरी अभिनेत्री आकांक्षा दुबेने आत्महत्या केली आहे. ती २५ वर्षांची होती. आकांक्षाने वाराणसीमधील सोमेंद्र हॉटेलमध्ये रविवारी(२६ मार्च) गळफास घेत जीवन संपवलं. आकांक्षा दुबे भोजपुरी मनोरंजनसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री होती. सध्या पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. आकांक्षा दुबे ‘मेरी जंग मेरा फैसला’, ‘मुझसे शादी करोगी’, ‘वीरो के वीर’, ‘फायटर किंग’, ‘कसम बदना वाले की २’ यांसारख्या सुपरहिट चित्रपटात झळकली.

Story img Loader