Akshara Singh Death Threat : भोजपुरी अभिनेत्री अक्षरा सिंग कायम चर्चेत असते. कधी तिच्या अभिनयाने तर कधी तिच्या हॉट लूकमुळे अक्षरा चर्चेचा विषय ठरते. भोजपुरी सिने विश्वातील अक्षरा सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री आहे. अभिनयासह जबरदस्त डान्सने तिनं संपूर्ण देशभरात चाहता वर्ग कमावला आहे. अशात आता अक्षराबाबत एक चिंताजनक बातमी समोर आली आहे.
अक्षराला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. तसेच तिच्याकडून खंडणीदेखील मागण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अक्षराकडे तब्बल ५० लाख रुपयांची खंडणी मागण्यात आली आहे. तसेच एवढी मोठी रक्कम देण्यासाठी तिला अवघ्या दोन दिवसांची मुदत देण्यात आलीये. अक्षराला फोन कॉलवरून ही धमकी मिळाली आहे. आलेल्या धमकीमुळे तिच्यासह चाहते चिंतेत आहेत.
अक्षराकडून पोलिसांत तक्रार दाखल
धमकीचा फोन येताच अक्षराने पोलिसांकडे धाव घेतली. तिनं बिहारच्या दानापूर पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार दाखल केली आहे. अक्षरा स्वत: दानापूरची रहिवासी आहे. त्यामुळे तिने येथे तक्रार दाखल केलीये. तक्रार दाखल झाल्यानंतर पोलीसदेखील अॅक्शन मोडमध्ये आले आहेत. त्यांनी धमकी देणाऱ्या व्यक्तीचा तपास सुरू केला आहे. खंडणीबहाद्दरानं अभिनेत्रीला शिवीगाळदेखील केल्याची माहितीही पोलिसांकडून समजली आहे.
भोजपुरीमधील सर्वांत गाजलेली अभिनेत्री
अक्षराला भोजपुरीमधील सर्वांत जास्त प्रसिद्ध आणि टॉपची अभिनेत्री म्हणून ओळखलं जातं. तिनं साल २०१० मध्ये रवी किशनसह ‘सत्यमेव जयते’ मधून सिनेविश्वात पहिलं पाऊल ठेवलं. बिग बॉस ओटीटीमध्ये सुद्धा अक्षरा स्पर्धक म्हणून सहभागी झाली होती. भोजपुरी चित्रपटांसह तिने अनेक मालिकांमध्येही सुद्धा काम केलं आहे.
२०१५ मध्ये आलेली ‘काला टिका’ ही अक्षराची पहिलीच मालिका होती. पहिल्या मालिकेनेच तिला भरभरून प्रेम दिले. या मालिकेतून अक्षरा घराघरात पोहचली. त्यानंतर ‘सर्वीस वाली बहू’मध्ये’ सुद्धा तिने दमदार पात्र साकारले. पुढे छोट्या पडद्यावर ती शेवटची २०२१ मध्ये बिग बॉसच्या घरात झळकली होती.
हेही वाचा : सलमान खानच्या ‘सिकंदर’ चित्रपटात झळकणार ‘बिग बॉस’चा स्पर्धक; सेटवरील फोटो आला समोर
u
अस्लम शेख दिग्दर्शित ‘माँ तुझे सलाम’ या चित्रपटातून अक्षरानं यशाचं शिखर गाठलं. ‘माँ तुझे सलाम’ मध्ये अक्षरानं पवन सिंगबरोबर मुख्य भूमिका साकारली होती. हा चित्रपट त्यावेळी सुपरहिट ठरला होता. यशाची वाटचाल सुरू असताना अक्षराला आता फोनवर अशा धमक्या येत असल्यानं चाहत्यांकडून चिंता व्यक्त केली जात आहे. पोलिसांनी अक्षराला खंडणी मागणाऱ्या व्यक्तीचा शोध सुरू केला आहे.
© IE Online Media Services (P) Ltd