‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ (Tula Shikvin Changlach Dhada) मालिका प्रेक्षकांच्या आवडत्या मालिकांपैकी एक आहे. वेगळ्या धाटणीचे कथानक आणि कलाकारांचा अभिनय यांमुळे या मालिकेला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळताना दिसतो. आता मालिकेत नवे वळण आले असल्याचे समोर आलेल्या प्रोमोमधून पाहायला मिळत आहे. झी मराठी वाहिनीने या मालिकेचा प्रोमो सोशल मीडियावर शेअर केला आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
झी मराठी वाहिनीने इन्स्टाग्रामच्या अधिकृत अकाउंटवरून तुला शिकवीन चांगलाच धडा या मालिकेचा एक प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमोमध्ये सगळे जण अक्षराला खोटे ठरवत असल्याचे पाहायला मिळत आहे. प्रोमोच्या सुरुवातीला अक्षरा आणि तिच्या सासू एकमेकींशी बोलत आहेत. अक्षरा चारुलताला म्हणते, “सकाळी तुम्ही कानामध्ये बुगड्या घातल्या होत्या की, नाही, हे सांगा आधी.” त्यावर चारुलता म्हणते, “इतक्या मोठ्याने का बोलत आहेस? तितक्यात घरातील सगळे गोळा होतात. अक्षराचा सासरा चारुहास विचारतो, “काय झालं अक्षरा?” त्यावर ती म्हणते, “या मॅडम आपल्याकडे आई म्हणून राहत होत्या इतके दिवस; पण या आई नाहीयेत. या भुवनेश्वरी मॅडम आहेत. चारुलता तिला म्हणते की, तू अशी वेड्यासारखी वागू नकोस. लोक तुला वेडे म्हणतील. अक्षरा म्हणते, मला वेड लागलेलं नाहीये. त्यानंतर सगळे जण तिला बोलत असून, ती मोठ्याने मी वेडी नाहीये, असे ओरडताना दिसत आहे. पुढे या प्रोमोमध्ये पाहायला मिळते की, दोन नर्स अक्षराला घेऊन दवाखान्यात जात आहेत आणि अक्षरा ओरडत म्हणते, “सोडा मला, मला डॉक्टरकडे जायचं नाहीये. मला वेड लागलं नाहीये.”
हा प्रोमो शेअर करताना, “अक्षराला खोटं ठरवलं जाणार, भुवनेश्वरी की चारुलता यातील गोंधळ आणखी वाढणार…!”, अशी कॅप्शन देण्यात आली आहे.
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया
या मालिकेचा प्रोमो पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी कमेंट्स केल्या आहेत. एका नेटकऱ्याने म्हटले, “शिक्षिका असून सुद्धा हिला शाळा कळतं नाही. लेखक खूपच हुशार आहे”, आणखी एका नेटकऱ्याने म्हटले, “आता अति झालं.”
“काय बावळटपणा आहे हा. शिक्षिका असूनही फोटो काढू शकत नाही. डोक्याचा वापर करीत नाही. मला तर आधीच माहीत होतं की ही भुवनेश्वरी आहे अक्षराला उशिरा कळलं. सगळेच हिला बरे दिसतात”, “आता काय तर अक्षराचा चारुहास होणार, तिला वेड्यात काढणार, अक्षरा कोणाला न सांगता शोध घेऊ शकत होती; पण हे काय करून ठेवले आता”, अशा प्रकारच्या कमेंट्स करीत नेटकऱ्यांनी आपले मत मांडले आहे.
मालिकेत दाखविल्याप्रमाणे, काही दिवसांपूर्वी चारुहासने भुवनेश्वरीला घराबाहेर काढले होते. अधिपतीसाठी भुवनेश्वरी खूप महत्त्वाची आहे. कारण- तिनेच त्याचा सांभाळ केला आहे. महत्त्वाचे म्हणजे एका अपघातात अधिपतीची खरी आई चारुलताचे निधन झाले आहे, असे कुटुंबातील सर्व जण समजतात. त्यानंतर त्यांच्या आयुष्यात भुवनेश्वरी येते, जी चारुलतासारखी दिसते. आता चारुहासने भुवनेश्वरीला घरातून बाहेर काढल्यानंतर चारुलता अक्षराला सापडते. अक्षरा तिला घरी आणते. चारुहास आणि चारुलता यांच्यातील नाते पूर्वीसारखे व्हावे यासाठी अक्षरा त्यांचे पुन्हा एकदा लग्नदेखील करण्याची तयारी करीत असल्याचे पाहायला मिळाले. मात्र काही दिवसांपासून चारुलताच भुवनेश्वरी असल्याचे तिला वाटत आहे. आता तिने हे सगळ्यांना सांगितल्यानंतर तिला वेडी ठरविण्यात आल्याचे समोर आलेल्या प्रोमोमधून पाहायला मिळत आहे.
आता त्यांच्याबरोबर राहणारी व्यक्ती भुवनेश्वरी आहे की चारुलता हे पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक असून, मालिकेत पुढे काय होणार, याकडे चाहत्यांचे लक्ष वेधले आहे.