‘बिदाई’ फेम अभिनेत्री सारा अली खानने तिचा पूर्वाश्रमीचा पती अली मर्चंटबद्दल केलेल्या वक्तव्यामुळे चर्चेत आली आहे. सारा व अलीने २०१०मध्ये ‘बिग बॉस’मध्ये भाग घेतला होते. तेव्हा ‘बिग बॉस’च्या घरात त्यांनी लग्न केलं होतं. पण घराबाहेर पडल्यानंतर दोन महिन्यातच ते वेगळे झाले होते. सारा सध्या शांतनू राजेला डेट करत आहे. पण अली अजूनही साराबद्दल बोलत असतो. याच गोष्टीवरून सारा अलीवर संतापली असून तिने काही आरोपही केले आहेत.

“…तर मी आता कुठे असते?” स्नेहा वाघच्या पोस्टने वेधलं लक्ष

Saif Ali Khan Attack Updates kareena kapoor first reaction
सैफ अली खानवर झालेल्या चाकू हल्ल्यानंतर करीनाची पहिली पोस्ट! म्हणाली, “प्रचंड आव्हानात्मक दिवस…”
Mahayuti Government
Shiv Sena : महाराष्ट्राला लवकरच तिसरा उपमुख्यमंत्री मिळणार,…
Saif Ali Khan Sister Saba Ali Khan Pataudi emotional post
“भाईजान आम्हाला तुझा…”, सैफ अली खानसाठी बहिणीची भावुक पोस्ट, बालपणीचा फोटो शेअर करत म्हणाली…
Saif Ali Khan And Arvind Kejriwal
Saif Ali Khan : “गुजरातच्या तुरुंगात बसलेला गुंड…” सैफ अली खानवरील हल्ल्यानंतर लॉरेन्स बिश्नोईचे नाव घेत केजरीवालांकडून भाजपा लक्ष्य
Saif Ali Khan Attack
Saif Ali Khan : “फक्त सैफ अली खान याचं आडनाव खान आहे म्हणून…”, हल्ल्याबाबत गंभीर शंका घेणार्‍या आव्हाडांना गृहराज्यमंत्र्यांचं प्रत्युत्तर
saif ali khan fought intruder wife kareena and sons were at home
सैफ अली खानवर चाकू हल्ला झाला तेव्हा करीना कपूर कुठे होती? इन्स्टाग्राम स्टोरी चर्चेत, खरी माहिती आली समोर
What Sanjay Raut Said?
Sanjay Raut : संजय राऊत यांची टीका, “सैफ अली खानवर हल्ला होणं ही बाब पंतप्रधान नरेंद्र मोदींसाठी…”
kaeena kapoor khan reaction on saif ali khan attack
“कुटुंबातील इतर सदस्य…”, पती सैफ अली खानवर झालेल्या हल्ल्याबद्दल करीना कपूरची पहिली प्रतिक्रिया

सिद्धार्थ कन्ननला दिलेल्या मुलाखतीत सारा खानने तिच्या लव्ह लाईफबद्दल काही गोष्टी शेअर केल्या. या मुलाखतीत साराचा बॉयफ्रेंड शांतनू राजेही उपस्थित होता. यावेळी त्यांना साराचा पूर्वाश्रमीचा पती अली मर्चंटबद्दल विचारण्यात आलं. अलीच्या असण्याने आता तुम्हाला काही फरक पडतो का? यावर शांतनू म्हणाला, “जेव्हा अलीने कंगनाच्या शो ‘लॉकअप’मध्ये एन्ट्री घेतली तेव्हा माझ्या मनात कोणत्याही प्रकारची इनसिक्युरीटी नव्हती. कारण सारा अलीला भाव देणार नाही हे मला माहीत होतं.”

लेक पाळण्यात असतानाच अभिनेत्री बनवण्याचं स्वप्न बघतेय आलिया भट्ट? म्हणाली…

पुढे सारा अली मर्चंटबद्दल बोलताना म्हणाली, “’लॉक अप’ शोमध्ये अलीला आणण्याआधी मला विचारण्यात आलं होतं. माझी त्यावर काहीच हरकत नसल्याचं मी सांगितलं. पण शोमध्ये मी त्याच्या येण्याआधी होते, तशी वागू शकणार नाही, हेही स्पष्ट केलं. अली आल्यावर मी शो खेळले नाही. खरं तर मी माझ्या आयुष्यात खूप पुढे गेले आहे. त्यामुळे मी त्याला महत्त्व देऊ इच्छित नाही.”

Video : लायकी काढली, वडिलांबाबत भाष्य केलं अन्…; अर्चना गौतमच्या अंगावर धावून गेला साजिद खान, भांडणाचा व्हिडीओ व्हायरल

अलीबरोबरच्या मैत्रीबद्दल विचारलं असता सारा म्हणाली, “मी मैत्री करण्यासही त्याला अनेकदा नकार दिला आहे. आमचं नातंही इतकं चांगलं नव्हतं की आमची मैत्री व्हावी. आता त्याने आयुष्यात पुढे जाण्याची वेळ आली आहे. तो जेव्हा कुठे दिसतो तेव्हा बोलायला हे येतो, हे मला नकोय. कारण मला ते आवडत नाही. खरं तर माझ्यासारखी मुलगी कधीच त्याची मैत्रीण होऊ शकत नाही. मी त्याच्याशी लग्न केलं होतं, तेव्हा मी खूप लहान होते, मला तेवढं कळत नव्हतं. त्यामुळे झालं ते झालं. पण आता तो आयुष्यात नकोय. मात्र एवढी वर्ष उलटून गेल्यानंतरही अली माझ्याबद्दल काही तरी वादग्रस्त मुद्दा शोधण्याचा प्रयत्न करतो. तो प्रसिद्धीचा, टीआरपीचा भुकेलेला माणूस आहे. कुठेही मी आणि मीडिया दिसले की त्याचं काहीतरी नवीन सुरू होतं.”

दरम्यान, साराच्या या आरोपांनतर अली यावर काय प्रतिक्रिया देतो, हे पाहणं महत्त्वाचं आहे. तर, सारा सध्या शांतनू राजेला डेट करतीये, दोघेही एकमेकांसोबत खुश आहेत.

Story img Loader