‘बिग बॉस १६’ या शो आता चांगलाच रंगात आला आहे. या शोमधील बहुचर्चित स्पर्धक म्हणजे शालीन भानोत. शोच्या पहिल्या आठवड्यापासूनच शालीने चर्चेत आहे. त्याने घरातील सदस्य सौंदर्या शर्माच्या अंतर्वस्त्रांवर अप्रत्यक्षपणे कमेंट केली होती. इतकंच नव्हे तर तिच्याकडे किसही मागितलं. हे सारं सुरु असताना त्याचं नाव ‘बिग बॉस’च्या घरातील सुंबुल तौकीर आणि टीना दत्ता यांच्याशी जोडलं गेलं आहे. पण आता एक वेगळंच चित्र तयार झालं आहे.
आणखी वाचा – करीनाचा लेक जमिनीवर लोळला तर आलियाने लपवलं बेबी बंप, कपूर कुटुंबियांचं दिवाळी सेलिब्रेशन पाहिलंत का?
सुबुंलला शालीन आवडत असल्याची चर्चा होती. दरम्यान सुबुंलच्या वडिलांनी ‘बिग बॉस १६’मध्ये येत तिला याबाबत समजावलं होतं. पण तिने वडिलांचं न ऐकता आहे तशीच ती वागत राहिली. आता शालीनने तिला नॉमिनेट केल्यानंतर या दोघांच्या नात्यामध्ये दुरावा निर्माण झाला आहे.
त्याचं झालं असं की शिव ठाकरे व सुंबुलमध्ये कोणत्या तरी एका व्यक्तीचं नाव नॉमिनेशनसाठी घ्यायचं होतं. यावेळी शालीन फक्त सुंबुलचंच नाव घेत होता. सुंबुलला हे पटलं नाही आणि यावरूनच शालीन-सुबुंलमध्ये वादाची ठिणगी पडली. कलर्स हिंदी वाहिनीने शेअर केलेल्या प्रोमोमध्ये दोघंही भांडताना दिसत आहे. “सुबुंलला सुरक्षित केलं पाहिजे असं एकदाही तू बोलला नाहीस. सारखी माझी परीक्षा घेऊ नका.” असं सुंबुल शालीनला बोलते. यावर शालीन तिला उलट-सुलट बोलायला सुरुवात करतो.
“अबे येडी, तुम्हे समझ नहीं आ रहा है क्या” असं शालीन तिला बोलतो. तसेच भांडणादरम्यान मला तुझी गरज नसल्याचंही शालीन म्हणाला. शालीनचं हे वागणं प्रेक्षकांना अजिबात पटलं नाही. म्हणूनच त्याला घरामधून बाहेर काढा अशी प्रेक्षक सध्या मागणी करत आहेत.