‘बिग बॉस हिंदी’च्या सोळाव्या पर्वाने प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे. रॅपर एमसी स्टॅनने ‘बिग बॉस हिंदी’च्या ट्रॉफीवर नाव कोरलं. एमसी स्टॅन त्याच्या गाण्याबरोबरच हटके स्टाइलसाठीही ओळखला जातो. ‘बिग बॉस’च्या घरात एमसी स्टॅनचे अनेक सदस्यांशी खटके उडायचे. अर्चना गौतम व एमसी स्टॅनमध्ये वारंवार वाद झालेले पाहायला मिळायचे. अनेकांच्या मते ‘बिग बॉस’चा विजेता हा शिव ठाकरे आहे. अर्चनाने नुकतेच शिव ठाकरेबद्दल वक्तव्य केलं आहे.
अर्चना गौतम व शिव ठाकरे ‘बिग बॉस हिंदी १६’च्या टॉप ५ फायनलिस्टपैकी एक होते. बिग बॉसच्या या घरात हे दोघेदेखील सतत भांडत असायचे, नुकतीच तिने माध्यमांसमोर शिव ठाकरेचं कौतुक केलं आहे. ती असं म्हणाली, “शिव ठाकरेकडे प्लस पॉइंट हा होता की तो मराठी बिग बॉस जिंकून आला होता त्याला माहिती होतं खेळायचं, तो डोक्याने खेळला मी मात्र डोक्याने खेळले नाही,” अशी प्रतिक्रिया तिने दिली.
नुकताच या दोघांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. फराह खानच्या पार्टीतील हा व्हिडीओ होता. ज्यात ‘जवानी जाने मन’ या गाण्यावर शिव व अर्चना रोमँटिक डान्स करताना दिसले होते. अर्चनाने शिव ठाकरेबरोबर डान्स केल्यामुळे नेटकऱ्यांनी तिला ट्रोल केलं होतं.
रॅपर एसमी स्टॅनने सर्वाधिक मतं मिळवत ट्रॉफीवर नाव कोरलं.तर शिव ठाकरे फर्स्ट रनर अप ठरला. अर्चनाला मात्र चौथ्या स्थानी समाधान मानावं लागलं. शिव ठाकरेचे अनेक चाहते आहेत, मराठी कलाकारांनीदेखील त्याला शुभेच्छा दिल्या होत्या.