‘बिग बॉस हिंदी’च्या सोळाव्या पर्वाने नुकताच प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे. रॅपर एमसी स्टॅनने बाजी मारत ‘बिग बॉस’च्या ट्रॉफीवर नाव कोरलं. मराठमोळा शिव ठाकरे ‘बिग बॉस हिंदी’च्या यंदाच्या पर्वाचा प्रबळ दावेदार मानला गेला होता. परंतु, त्याला दुसऱ्या स्थानावर समाधान मानावं लागलं. त्याचा चाहतावर्ग मोठा आहे. नुकतंच त्याने मराठी व हिंदी बिग बॉसबद्दल भाष्य केलं आहे.
शिवने ‘बिग बॉस’च्या घरातून बाहेर पडल्यानंतर इटाईम्सला दिलेल्या मुलाखतीत तो असं म्हणाला, “माझा प्रवाससारखा नव्हता. हिंदी व मराठी बिग बॉस हे दोन्ही वेगळे आहेत. मला माझ्या मराठी लोकांचा पाठिंबा मिळाला हे मी नाकारू शकत नाही पण बिग बॉस हिंदीमध्ये माझे दिवस पूर्णपणे वैविध्यपूर्ण होते. सर्वप्रथम बिग बॉस १६ मध्ये संपूर्ण देश मला दररोज पाहत होता. त्यामुळे उत्तम परफॉर्मन्स देण्यासाठी माझ्यावर दबाव होता आणि सुरवातीपासूनच मला त्यांचे मन जिंकायचे होते. त्यात मी आधीच मराठीमध्ये जिंकलो होतो त्यामुळे माझ्यावर अधिक दबाव होता.”
‘हेरा फेरी ३’ च्या सेटवरचा फोटो व्हायरल; बाबुराव, श्याम व राजूची पहिली झलक पाहिलीत का?
तो पुढे असं म्हणाला, “मी त्यांचे मन जिंकू शकलो की नाही हे माझ्यापेक्षा लोकांना चांगले माहिती आहे पण बिग बॉस १६ मध्ये मला जे प्रेम व विश्वास मिळाला आहे तो व्यक्त करू शकत नाही. पाकिस्तान, बांगलादेश आणि इतर देशांमधील लोकांनी मला पाठिंबा दिला, ही माझी मोठी कामगिरी समजतो.” अशा शब्दात त्याने प्रतिक्रिया दिली आहे.
शिव ‘बिग बॉस मराठी’च्या दुसऱ्या पर्वातही सहभागी झाला होता. या पर्वाचा तो विजेताही ठरला होता. त्यामुळे ‘बिग बॉस हिंदी’ची ट्रॉफीही शिव नावावर करेल, अशी चाहत्यांना अपेक्षा होती. परंतु, एमसी स्टॅनला सर्वाधिक मतं मिळाल्यामुळे शिवची हिंदी बिग बॉसची ट्रॉफी हुकली.