दिग्दर्शक-निर्माता साजिद खानने हिंदी ‘बिग बॉस’च्या घरामध्ये एंट्री केली. हिंदी ‘बिग बॉस’च्या १६व्या पर्वामध्ये तो पुढे काय काय धमाल-मस्ती, राडे करणारा हे काही दिवसांमध्ये स्पष्ट होईलच. पण साजिद ‘मी टू’ प्रकरणामुळे बराच चर्चेत आला होता. त्याचं खासगी आयुष्यही नेहमीच चर्चेचा विषय ठरलं. आता ‘बिग बॉस’च्या घरामध्ये त्याने आपल्या खासगी आयुष्याबाबत खुलासा केला आहे. तसेच करिअरच्या सुरुवातीच्या काळाबाबत साजिदने सांगितलं आहे.

‘बिग बॉस १६’च्या आधीच्या भागामध्ये एलिमिनेशनसाठी नॉमिनेश प्रक्रियेला सुरुवात झाली. यामध्ये इतर काही स्पर्धकांबरोबर साजिद खानलाही नॉमिनेट करण्यात आलं. साजिदला स्पर्धक व अभिनेत्री शालिन भनोटने नॉमिनेट केलं. शालिन-साजिदमध्ये सुरुवातीला चांगली मैत्री पाहायला मिळाली. पण जेव्हा तिनेच आपल्याला नॉमिनेट केलं हे समजल्यानंतर साजिदला वाईट वाटलं.

यानंतर साजिद शालिनबरोबर याविषयावर बोलतो. तेव्हा साजिदला या शोची फार गरज नाही. त्याच्या तुलनेमध्ये स्पर्धक मान्या सिंहला शोची जास्त गरज आहे कारण तिचे वडील रिक्षा चालवतात. मान्याला आपल्या वडिलांना मर्सिडिज कार गिफ्ट करायची आहे. असं शालिन म्हणते. शालिनचं हे म्हणण ऐकूनच साजिद आपल्या करिअरच्या सुरुवातीच्या दिवसांबाबत भाष्य करतो.

आणखी वाचा – Video : प्राजक्ता माळीच्या घराची सफर, अभिनेत्रीने आपल्या हक्काच्या घराची केली सुंदर सजावट

साजिद म्हणतो, “वयाच्या १४व्या वर्षी मी रस्त्यावर टूथब्रश विकले आहेत. मी इथवर पोहोचण्यासाठी खूप मेहनत घेतली आहे.” साजिद ‘बिग बॉस’मध्ये राहू इच्छित नाही असंही शालिन यावेळी बोलली. पण साजिदला जेव्हा ‘बिग बॉस’ने याबाबत विचारलं तेव्हा असं काहीच नसल्याचं त्याने स्पष्टपणे सांगितलं.

Story img Loader