‘मीटू’च्या आरोपांमध्ये अडकलेला बॉलिवूडचा सुप्रसिद्ध दिग्दर्शक साजिद खान ‘बिग बॉस १६’ शोमध्ये सहभाग झाला. या शोमध्ये सहभागी झाल्यानंतर त्याच्यावर जोरदार टीका होत आहे. साजिद खानला घराबाहेर काढा अशी प्रेक्षक सतत मागणी करत आहेत. तर काही अभिनेत्रींनी पुन्हा एकदा साजिद खानवर लैंगिक शोषणाचे आरोप केले आहेत. आता ‘दिया और बाती’ फेम अभिनेत्री कनिष्का सोनीने साजिद खानवर गंभीर आरोप केले आहे. तसेच कनिष्काने काही धक्कादायक खुलासे केले आहेत.

काय म्हणाली कनिष्का सोनी?
कनिष्काने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये तिने साजिदने माझा लैंगिक छळ केला असल्याचं म्हटलं आहे. ती म्हणाली, “काही दिवसांपूर्वीच प्रसारमाध्यमांना दिलेल्या मुलाखतीमध्ये मी सांगितलं होतं की एका दिग्दर्शक-निर्मात्याने मला घरी बोलावून माझं पोट दाखवण्यास सांगितलं होतं. मला त्या दिग्दर्शकाचं नाव घ्यायचं नाही असं मी म्हटलं होतं. पण मला अशी वागणूक देणारी व्यक्ती ही ‘बिग बॉस’च्या घरामध्ये आहे.”

“मी आधी त्या दिग्दर्शकाचं नाव घेणार नव्हती. पण त्याचं नाव घेण्यापूर्वी मी खूप घाबरली आहे. मला भारतात येण्याचीही भीती वाटत आहे. कारण अशी लोकं काहीही करू शकतात. ‘बिग बॉस’ने त्याला जी प्रसिद्धी दिली आहे त्यासाठी तो योग्य नाही. आणि त्या व्यक्तीचं नाव आहे साजिद खान. २००८मध्ये मी काही रिअॅलिटी शो केले. तेव्हा माझ्याकडे काही काम नव्हतं. त्यादरम्यान मी सेलिब्रिटी मंडळींची मुलाखत घ्यायचे. यादरम्यान मी साजिद खानची मुलाखत घेतली. तसेच मुलाखत झाल्यानंतर आपल्याला अभिनय क्षेत्रात काम करायचं आहे. मला मदत कराल का? असं मी त्यांना म्हटलं. त्यानंतर त्यांनी मला त्यांच्या घरी बोलावलं.”

आणखी वाचा – खासगी MMS व्हिडीओ लीक झाल्यानंतर सुप्रसिद्ध अभिनेत्रीची पहिली प्रतिक्रिया, म्हणाली, “तुमच्या आई-बहिणींबरोबर…”

पुढे ती म्हणाली, “तुझी शरीररचना मुख्य अभिनेत्रीसाठी अगदी परफेक्ट आहे. आता तुझं पोट दाखव. घाबरू नको मी तुला टचही करणार नाही असं साजिद त्यावेळी म्हणाला. पण माझं पोट दाखवण्यास मी नकार दिल्यानंतर त्याने चित्रपटामध्ये तुला काम देणार नाही असं सांगितलं. काही वर्षांनंतर मी पुन्हा एकदा साजिदला भेटले. त्यावेळीही त्याने याचप्रकारची वागणूक मला दिली. इतकंच नव्हे तर माझ्याशी लग्न करायची त्याची इच्छा होती.” सलमान खानने त्याला ‘बिग बॉस’मध्ये घ्यायला पाहिजे नव्हतं असंही कनिष्का यावेळी म्हणाली.

Story img Loader