हिंदी ‘बिग बॉस’च्या १६व्या पर्वाला काही दिवसांपूर्वीच सुरुवात झाली. या शोच्या पहिल्या आठवड्यापासूनच स्पर्धकांमध्ये भांडण, राडे झाले. ‘बिग बॉस १६’चा दुसरा आठवडाही चांगलाच गाजणार असल्याची चिन्ह दिसत आहेत. प्रत्येक खेळ जिंकण्यासाठी घरातील स्पर्धक कोणत्याही थराला जाऊ शकतात हे पुन्हा एकदा नव्या भागामध्ये सिद्ध झालं आहे. स्पर्धक शालीन भानोतने महिला स्पर्धकाला खेळादरम्यान धक्का दिल्याने त्याला घरामधून बाहेर काढा अशी मागणी होत आहे.

नेमकं काय घडलं?
स्पर्धक निमृत कौर अहलूवालिया कॅप्टन पदावरून हटवण्यात आलं. त्यानंतर कॅप्टन पदासाठी सगळ्या स्पर्धकांना टास्क देण्यात आला. घराच्या गार्डन परिसरामध्ये जाऊन सगळ्यात आधी जो हॉर्न वाजवेल तोच कॅप्टन बनण्यासाठी योग्य ठरेल असं ठरलं. यावेळी शिव ठाकरे व गौतम विगने सगळ्यात आधी हॉर्न वाजवला. यादरम्यान स्पर्धकांना शिव व गौतमला समर्थन द्यायचं होतं.

Bigg Boss 18 Fame Rajat Dalal talk about chahat pandey and controversy
Video: चाहत पांडेचं नाव ऐकताच रजत दलालने जोडले हात, विनंती करत म्हणाला…
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
Bigg Boss 18 Chum Darang Talking In Marathi Language Video Viral
Bigg Boss 18: “खूप छान…”, चुम दरांगने मराठीत साधला संवाद, विवियन डिसेनाच्या सक्सेस पार्टीबद्दल म्हणाली…
vivian dsena first reaction after karenveer mehra won bigg boss 18
करणवीर मेहरा Bigg Boss 18 चा विजेता ठरल्यावर विवियन डिसेनाची पहिली प्रतिक्रिया; म्हणाला, “त्याच्या…”
Marathi actress Abhidnya Bhave Special Post For Bigg Boss 18 Winner Karan Veer Mehra
Bigg Boss 18: “अखेर खरा निकाल लागला…”, करणवीर मेहरा विजयी होताच लोकप्रिय मराठी अभिनेत्रीची खास पोस्ट, दोघांनी एकत्र केलं होतं काम
Bigg Boss 18 Grand Finale chahat pandey and salman khan
‘बिग बॉस’च्या मंचावर सलमान खानला घातली लग्नाची मागणी, I Love You सुद्धा म्हणाली; चाहत पांडेला भाईजानने काय उत्तर दिलं?
Bigg Boss 18 Grand Finale Winner Karanveer Mehra
Bigg Boss 18 Winner : ‘बिग बॉस’च्या १८व्या पर्वाचा विजेता ठरला करणवीर मेहरा
Bigg Boss 18 Vivian Dsena angry on karan veer Mehra roasting
Bigg Boss 18: दोन वर्षांच्या मुलीवरून खिल्ली उडवल्यामुळे विवियन डिसेना भडकला करणवीर मेहरावर, रागातच्या भरात केलं ‘हे’ कृत्य

शिववर राग काढण्यासाठी शालीनने त्याला त्रास देण्यास सुरुवात केली. यावेळी शिवची मैत्रिण अर्चना गौतम शालीनला हे कृत्य करण्यापासून थांबवू लागली. हे सगळं सुरु असताना अर्चनाला शालीनचा धक्का लागला आणि तिला किरकोळ दुखापत झाली. यावरून तिने राडा करण्यास सुरुवात केली. शालीनला घराबाहेर काढा अशी मागणी करू लागली. पण शालीनच्या बाजूने मराठमोळी अभिनेत्री ऋता दुर्गुळेने आपलं मत व्यक्त केलं आहे.

आणखी वाचा – खासगी MMS व्हिडीओ लीक झाल्यानंतर सुप्रसिद्ध अभिनेत्रीची पहिली प्रतिक्रिया, म्हणाली, “तुमच्या आई-बहिणींबरोबर…”

तिने इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे पोस्ट शेअर करत म्हटलं की, “एखाद्याला जाणीवपूर्वक त्रास देणाऱ्यांमध्ये शालीन भानोत नाही. त्याच जिद्दीने तो पुन्हा परतणार हे नक्की.” ऋताचं हे वक्तव्य सध्या चर्चेत आहे. सोशल मीडियावरही काहींनी शालीनला पाठिंबा दिला आहे. तर काहींनी त्याने केलेलं कृत्य चुकीचं असल्याचं म्हटलं आहे.

Story img Loader