बॉलिवूडचा सुप्रसिद्ध दिग्दर्शक साजिद खानने ‘बिग बॉस १६’च्या घरामध्ये एण्ट्री केली. साजिदचं ‘बिग बॉस’च्या घरामध्ये जाणं कलाक्षेत्रामधील काही अभिनेत्रींना अजिबात पटलेलं नाही. सतत त्याच्यावर लैंगिक अत्याचाराचे आरोप करण्यात येत आहेत. दरम्यान ‘बिग बॉस’च्या घरामध्ये आता त्याचा खरा चेहरा समोर येत असल्याचं प्रेक्षक म्हणत आहेत. यामागचं कारण म्हणजे स्पर्धक गौतम विग व साजिदमधील भांडण. या दोघांमध्ये वादाची ठिणगी पडली आणि यादरम्यान साजिदचा राग अनावर झाला असल्याचं पाहायला मिळालं.
आणखी वाचा – “माझ्याविषयी घाणेरड्या अफवा पसरवून…” मराठी ‘बिग बॉस’ फेम मीरा जगन्नाथची पोलिसांत तक्रार, नेमकं प्रकरण काय?
साजिद-गौतममधील वाद नेमका काय?
‘विकेण्ड का वार’ या भागामध्ये स्वतःला नॉमिनेशनपासून वाचवण्यासाठी गौतमने घरातील एका आठवड्याचं रेशन न घेण्याचा निर्णय घेतला. गौतमच्या या निर्णयानंतर घरातील स्पर्धक त्याच्याविरुद्ध बोलू लागले. पण त्यानंतर गौतमला आपण केलेली ही चूक लक्षात आली. मात्र साजिदने रागाच्या भरात गौतमला या गोष्टीवरूनच सुनवायला सुरुवात केली.
साजिद गौतमला शिवीगाळ करू लागला. इतकंच नव्हे तर गौतमच्या आई-वडिलांवरूनही साजिद भांडणामध्ये अपशब्द वापरू लागला. भांडण सुरु असताना साजिदची भाषा ऐकून ‘बिग बॉस’लाही काही शब्दांसाठी आवाज म्युट करावा लागला. दरम्यान शिव ठाकरे व एमसी स्टॅनला साजिदला समजवण्याचा प्रयत्न केला. पण त्याने कोणाचच ऐकलं नाही.
रागाच्या भरात तो अपशब्द बोलू लागला. साजिदने गौतमला अश्लील इशारेही केले. साजिदचं हे रूप पाहून प्रेक्षक त्यांच्यावर भडकले आहेत. शिवाय त्याला घरातून बाहेर काढा अशी मागणी पुन्हा होत आहे. पण आता साजिदला सलमान खान काय बोलणार? ‘बिग बॉस’ नेमका काय निर्णय घेणार? याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.